Crime News : सहाय्यक फौजदारास मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल; तिघे अटकेत

या घटनेमुळे पाेलिस दलात खळबळ उडाली.
nalasopara crime news, police
nalasopara crime news, policeSaamTv

Nalasopara Crime News : नालासोपारा पेल्हार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस फौजदारास गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. फौजदारांवर विरारच्या संजिवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. (Nalasopara Latest Marathi News)

पेल्हार पोलीस (police) ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेले संजीव पंडीत सोनवणे (५३) हे शनिवारी दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यातील विरोधकांना समज देण्यासाठी जिवदानी चाळ बिलालपाडा परिसरात गेले हाेते.

nalasopara crime news, police
Abdul Sattar Video: अब्दुल सत्तारांनी पातळी सोडली; सुप्रिया सुळेंबाबत वापरला आक्षेपार्ह शब्द, राज्यभरातून संताप

तेथे सात ते आठ महिला, पुरुषांनी जमाव करुन त्यांना दमदाटी करुन शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात सोनवणे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर विरार येथील संजीवनी रुग्णालयात (hospital) उपचार सुरू आहेत. तर पेल्हार पोलिसांनी (police) या प्रकरणी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करत तीन संशयितांना अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

nalasopara crime news, police
Satara Breaking News : नगरसेविकेवर जीवघेणा हल्ला; रुग्णालयात दाखल, पाेलिस तपास सुरु

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com