Abdul Sattar News
Abdul Sattar NewsSaam tv

Abdul Sattar Video: अब्दुल सत्तारांनी पातळी सोडली; सुप्रिया सुळेंबाबत वापरला आक्षेपार्ह शब्द, राज्यभरातून संताप

Abdul Sattar Controversial Statement: जे आमच्यावर टीका करतील ते, महिला असो की पुरुष असो त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं सत्तार म्हणाले आहेत.

प्राची कुलकर्णी, पुणे

Abudul Sattar Latest News: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. सत्तार यांची जीभ नुसती घसरलीच नाही तर, त्यांनी सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) थेट शिवीगाळ केली आहे. याबाबत सत्तार यांंना जराही खेद नसल्याचं दिसतंय. अत्यंत गलिच्छ शब्द वापरुनही त्यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जे आमच्यावर टीका करतील ते, महिला असो की पुरुष असो त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं सत्तार म्हणाले आहेत. (abdul sattar controversial statement on supriya sule)

पाहा व्हिडिओ -

अब्दुल सत्तार हे सिल्लोड येथे एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना कृषीमंत्री सत्तार यांनी हा गलिच्छ शब्दप्रयोग केला आहे. पन्नास खोक्यांच्या मुद्द्यावरुन सत्तारांना प्रश्न विचारला असता, सत्तार म्हणाले आम्हाला बदनाम करण्याचा अधिकार यांना कुणी दिला? असं म्हणत सुळेंना खूपच वाईट शब्दांत प्रतिक्रीया दिली आहे. (Latest Marathi News)

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनंतर आता विरोधक हे सरकारवर तुटून पडले आहेत. याबाबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनीही सत्तारांना धारेवर घेतलं आहे. तर रुपाली ठोंबरे पाटील यांसह अनेक नेत्यांनी सत्तारांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीची महिला आयोगाकडे तक्रार

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संसदरत्न माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविरुद्ध अपमानास्पद उद्गार काढले आहेत. महिलांविरुद्ध अपमानास्पद उद्गार काढून त्यांचा सामाजिक दर्जा व कर्तुत्व हनन करणे हा या सरकारचा मुख्य अजेंडा आहे असे मागील एक दोन घटनांवरून स्पष्ट होत आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अॅडव्होकेट अमोल मातेले यांनी केला. तरी या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, ई-मेल द्वारे पत्र पाठवून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com