Tushar Gandhi : ...त्यामुळे नोटांवर गांधीजींचा फोटो नसावा; तुषार गांधींना असं का वाटतं?

डोंबिवलीत एका खाजगी कार्यक्रमासाठी आलेल्या तुषार गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
Tushar Gandhi
Tushar GandhiSaam Tv
Published On

अभिजीत देशमुख

Tushar Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात राबविलेली भारत जोडो यात्रा आवश्यक उपक्रम होता. त्यातून खूप चांगला संदेश समाजात पोचला असून पक्ष या संधीचा फायदा कसा करून घेतो हे पाहणे गरजेचे आहे.

मात्र यातून मिळालेले यश कशा प्रकारे पक्षाकडून व्यापक बनवला जातो यावर यात्रेचे भवितव्य अवलंबून असेल असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मांडले. डोंबिवलीत एका खाजगी कार्यक्रमासाठी आलेल्या तुषार गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

Tushar Gandhi
Congress News: अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करा; एसबीआय बँकेसमोर काँग्रेसचे आंदोलन

यावेळी पुढे बोलताना त्यांनी भारताच्या चलनावर महात्मा गांधी यांचा फोटो आहे. मात्र ज्याप्रकारे या चलनाचा वापर होतो ते गांधीच्या तत्वांविरोधात आहे. आज पैशाचा फायदा श्रीमंतांना होतो गरिबांना नव्हे त्यामुळे नोटांवर गांधीजींचे (Mahatma Gandhi) फोटो नसावेत असे आपले ठाम मत असल्याचे ते म्हणाले.

राजकीय पक्षातील नेत्यांकडून महापुरुषांवर केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्याबाबत बोलताना त्यांनी प्रत्येकाने महापुरुष वाटून घेतले असून स्वताच्या महापुरुषाची स्तुती करून दुसऱ्याच्या महापुरुषावर टीका करणे म्हणजे महापुरुषावर अन्याय करत असून हा केवळ राजकारणाचा प्रकार आहे.

Tushar Gandhi
Kasba Bypoll Election : कसब्यातील पोटनिवडणुकीवरुन चंद्रकांत पाटील, राज ठाकरेंना राेहित पवारांचा टाेला

वास्तविक नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रकार केले जात असून सामान्य माणसाना भेडसावणारे प्रश्न त्यांनी कायमच दुर्लक्षित केल्यानेच त्यांना अशा प्रकारे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी महापुरुषांचा आधार घ्यावा लागत असल्याचे सांगितले. यावेळी गांधी गोडसे चित्रपटावरून लक्ष विचलित करण्यासाठी पठाण चित्रपटाचा वाद निर्माण करण्यात आल्याचे मत त्यांनी मांडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com