Congress News: अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करा; एसबीआय बँकेसमोर काँग्रेसचे आंदोलन

अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करा; एसबीआय बँकेसमोर काँग्रेसचे आंदोलन
Congress News
Congress NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख

कल्याण : हिंडेनबर्ग रीसर्चचा अहवालसमोर आल्यानंतर उद्योगपती अदानी पुन्हा चर्चेत आले असून वादाच्या भोवऱ्यात (Kalyan News) सापडले आहेत. याप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. संसदेनंतर आता हा मुद्दा घेऊन काँग्रेसने (Congress) रस्त्यावर उतरली आहे. (Tajya Batmya)

Congress News
Buldhana News: कर्जाचा बोजा असल्‍याने अल्‍पभुधारक शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

देशभरात काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली असून या पाश्‍र्वभूमीवर आज कल्याणमध्ये जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली एसबीआय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली आहे. जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे.

पैसा सुसक्षित राहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू असल्याचे पोटे यांनी सांगितले. विरोधकांची इडी चौकशी करणारी मोदी सरकार अदाणी समूहाची इडी चौकशी करणार का? असा सवाल त्यांनी वेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com