Mumbai Local: लोकलची गर्दी वाढली; दररोज तब्बल ६० लाख प्रवाशी करतायत लोकलवारी...

Mumbai Local Train Latest News: सध्या मध्य रेल्वे मार्गावर ३५ लाख प्रवासी दररोज लोकलने प्रवास करतायत, तर पश्चिम मार्गावर २५ लाख प्रवासी दररोज लोकलवारी करत आहेत.
The crowd grew in Mumbai Local Train
The crowd grew in Mumbai Local TrainSaam Tv
Published On

मुंबई: देशासह राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घटत आहे. सोबतच लसीकरणाचा वेगही वाढला असल्याने बहुसंख्य लोकांचं कोरोना लसीकरण (Vaccination) झालं आहे. याचाच परिणाम म्हणून मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) आता गर्दी (Crowd) वाढू लागली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलचा पास मिळतो, त्यामुळे पुर्वीप्रमाणेच आता लोकलची गर्दी वाढू लागली आहे. (The crowd grew in Mumbai Local Train; Every day 60 lakh passengers are traveling by local ...)

हे देखील पहा -

The crowd grew in Mumbai Local Train
१७० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून पती-पत्नीवर गुन्हा दाखल

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर कोविड पूर्व काळात दररोज सुमारे ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र २१ मार्च २०२० पासून कोविड १९ मुळे टाळेबंदी लागू झाल्यानं सुरुवातीला ४ महिने सर्वसामान्यांसाठी लोकल बंद होत्या. पुढे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्यानंतर, तेव्हा दररोज १५ लाख प्रवासी प्रवास करू लागले. त्यानंतर लशीच्या दोन्ही मात्रा घेणाऱ्या प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यामुळे सध्याच्या घडीला दररोज ६० लाख प्रवासी लोकलने प्रवास करू लागले आहेत.

The crowd grew in Mumbai Local Train
LPG Price: घरगुती LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, आजपासून नवीन दर लागू

येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर ३५ लाख प्रवासी दररोज लोकलने प्रवास करतायत, तर पश्चिम मार्गावर २५ लाख प्रवासी दररोज लोकलवारी करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com