

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन मे. स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे महानगरपालिकेला होणारा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बुधवार दि. 01/07/2026 रोजी सकाळी 9.00 वा. ते गुरूवार दि. 02/07/2026 रोजी सकाळी 9.00 वा. पर्यत असा 24 तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवावा असे स्टेम प्राधिकरणाने कळविले आहे. त्यानुसार बुधवार दि. 01/07/2026 रोजी सकाळी 9.00 वा. ते गुरूवार दि. 02/07/2026 रोजी सकाळी 9.00 वा. पर्यत मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
तथापि, ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा, रेतीबंदर, व मुंब्र्याचा काही भाग आदी ठिकाणांचा पाणीपुरवठा बुधवार सकाळी 09.00 ते रात्री 09.00 वाजेपर्यत बंद राहील व समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रुस्तमजी, दोस्ती, आकृती, वर्तकनगर (म्हाडा) इत्यादी भागात बुधवार रोजी रात्री 9.00 ते गुरूवार सकाळी 9.00 वा. पर्यत बंद राहील, अशा रितीने टप्याटप्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
वरील शटडाऊन मुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.