Sakshi Sunil Jadhav
आपल्या शरीरातला किडनी हा अवयव हा २४ तास न थांबता काम करतो. रक्त शुद्ध करणे, शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकणे ही महत्त्वाची कामं किडनी करत असते.
तुम्ही किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणं दुर्लक्षित करत असाल तर तुम्हाला भविष्यात तुमचा जीव गमवावा लागू शकतो.
लघवीचं प्रमाण अचानक कमी किंवा जास्त होत असेल तर हे किडनीच्या समस्येचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. रात्री सतत लघवीला जाण्याची गरज भासत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
लघवीचा रंग गडद असेल किंवा त्यात जास्त फेस दिसत असेल तर हे किडनी नीट काम करत नसल्याचे संकेत असू शकतात.
लघवीत रक्त दिसणे हे किडनी किंवा मूत्रमार्गाशी संबंधित गंभीर समस्येची लक्षणे असू शकतात. ही समस्या दुर्लक्षित करणं महागात पडेल.
किडनी शरीरातलं जास्तीचं पाणी बाहेर काढू टाकत नसेल तर पाय, घुडगे, हात आणि डोळ्यांभोवती सूज येऊ शकते. सकाळी उठल्यानंतर चेहरा सुजलेला दिसत असेल तर सावध राहा.
किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर रक्तातले घातक पदार्थ साचतात. त्यामुळे सतत थकवा, अशक्तपणा आणि कामात उत्साह कमी झाल्यासारखं वाटू शकतं.
शरीरात जर विषारी पदार्थ साचत असतील तर भूक कमी लागते, उलटी सारखं वाटतं अशी लक्षणं दिसतात.
तज्ज्ञांच्या मते, किडनीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते. त्यामुळे वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.