Sakshi Sunil Jadhav
काहींना वाटतं की, ऐकण्याची क्षमता कमी झाली की, अचानक कानांनी ऐकू येणं बंद होतं. पण हे सत्य नाही.
प्रत्यक्षात बहिरेपणाची समस्या हळूहळू सुरू होते आणि सुरुवातीची लक्षणं इतकी सामान्य वाटतात की, लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
वय वाढणं, थकवा किंवा आजूबाजूचा गोंगाट यामुळे असं होत असेल असं समजून अनेकजण उपचार घेण्यास उशीर करतात.
तज्ज्ञांच्या मते, ऐकण्याची क्षमता कमी होण्याची सुरुवातीची चिन्हे वेळेत ओळखल्याने पुढची गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. कानांशी संबंधित काही लक्षणं सतत जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे.
बऱ्याचदा समोरचा व्यक्ती बोलत असेल तर ऐकू येतं, पण त्याचे शब्द नीट समजत नाहीत. हे ऐकण्याची क्षमता कमी होण्याचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
रेस्टॉरंट, कौटुंबिक कार्यक्रम किंवा गर्दीच्या ठिकाणी बोलणं समजणं जरा कठीण होत असेल तर ते गंभीर लक्षण मानलं जातं.
समोरच्या व्यक्तीला वारंवार बोलणे पुन्हा सांगण्याची विनंती करावी लागत असेल तर ही समस्या दुर्लक्षित करू नये.
घरातील इतरांना आवाज खूप मोठा वाटत असताना स्वतःला तो नॉर्मल वाटत असेल तर ऐकण्याच्या क्षमतेत घट होत असण्याची शक्यता असते.
कानात शिट्टी, घंटानाद, गुंजन किंवा भुणभुण असा आवाज सतत येत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही लक्षणे सातत्याने जाणवत असतील तर कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.