Thane Crime News: ठाण्यात ४ महिला शिक्षकांचा विनयभंग; मनसे कार्यकर्त्यांनी भरशाळेतच संस्थाचालकाला चोपला, VIDEO

MNS takes action on molestation: ठाण्यातील श्रीनगर येथील विनयभंग करणाऱ्या संस्थाचालक आणि शिक्षकाला मनसेकडून चोप देण्यात आला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Thane Crime
Thane CrimeSaam Tv News
Published On

ठाण्यातील श्रीनगर येथे चार महिला शिक्षकांसोबत विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. संस्थाचालक आणि शिक्षकानेच महिला शिक्षकांसोबत विनयभंग केलााय. या धक्कादायक घटनेनंतर मनसे शहराध्यक्षांनी धाव घेत संस्थाचालक आणि शिक्षकाची चांगलीच शाळा घेतली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शाळेतील महिला शिक्षकांसोबत संस्थाचालक आणि शिक्षकानं विनयभंग केला आहे. ही घटना ठाण्यातील श्रीनगर येथील वागळे इस्टेट परिसरातील शाळेत घडली आहे. या प्रकरणानंतर चार पीडित शिक्षकांनी थेट श्रीनगर पोलीस ठाणे गाठले आणि संस्थाचालक आणि शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची माहिती काही मनसे शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी थेट शाळा गाठत मनसे स्टाईल संस्थाचालकाची शाळा घेतली.

Thane Crime
Guillain-Barré Syndrome: मेंदू व्हायरसचं थैमान, २४ पेशंट व्हेंटिलेटरवर; केंद्राचं पथक पुण्यात

मनसे पदाधिकारी आणि मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी माहिती मिळताच पीडित महिला शिक्षकांच्या मदतीला धावून गेले. मनसे शहराध्यक्ष आणि काही सहकाऱ्यांनी संस्थाचालक आणि शिक्षकाला मनसे स्टाईल चांगलाच चोप दिला आहे. त्यानंतर पीडित महिला शिक्षकांनी श्रीनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Thane Crime
Bandra Worli Sea Link Extension: मुंबई दक्षिण ते उत्तर टोक फक्त ९ मिनिटात, दहीसरपर्यंतचा प्रवास सुसाट

याप्रकरणी मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे सांगतात, 'काही महिला शिक्षका आमच्याकडे विनयभंगाची तक्रार घेऊन आल्या होत्या. संस्थाचालक आणि शिक्षकानं चार महिला शिक्षकांसोबत विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती मिळाली. त्यानंतर मनसे पदाधिकारी आणि काही सहकाऱ्यांसोबत शाळा गाठत संस्थाचालक आणि शिक्षकाला चांगलाच चोप दिला आहे. आमच्याकडे आलेल्या तक्रारींची आम्ही दखल घेतो. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com