ठाण्याच्या लेडी डॉनला वाचवतंय कोण? ठाणे बीडपेक्षा वाईट, राऊतांचा हल्लाबोल

Who Is Protecting Thane's 'Lady Don'? प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. संजय राऊतांनी ठाण्याच्या परिस्थितीवरून सरकारवर निशाणा साधला असून, पूर्णेकर कुटुंबीयांनी पप्या शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.
Pappya Shinde Under Scanner in Purnekar  Case
Pappya Shinde Under Scanner in Purnekar Casesaam tv
Published On: 

ठाकरेसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर आता ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलयं...उद्धव ठाकरेनेही पूर्णेकर कुटुंबीयांची ठाण्यात राहत्या घरी भेट घेतलीय.. अशातच पूर्णेकरांच्या हत्येवरून ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीसांवर निशाणा साधालाय...ठाण्याची अवस्था ही बीडपेक्षा वाईट असल्याचं म्हणत राऊतांनी ठाण्याची तुलना थेट बीडसोबत केलीय...

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर त्यांच्या कुटुंबियांनी शिंदेसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राऊतांनी मीनाक्षी शिंदेंना थेट लेडी डॉन म्हटलं असून त्यांना कोण वाचवतंय असा सवाल केलाय..

पूर्णेकरच्या घरात गुंड घुसवून संपवेन असे ही बाई सांगतेय!

हिची अटक कधी होणार?

ठाण्याचे “बीड " झाले आहे

या लेडी डॉन ला कोण वाचवतेय?

पूर्णेकरांच्या हत्येचा आणखी काय पुरावा पोलिसांना हवाय?

अमित शहा ने कोठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र?

ठाणेकरांनो जागे व्हा.

राऊतांनी मीनाक्षी शिंदेंची एक ऑडिओ क्लिपही पोस्ट केलीय.

दुसरीकडे प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येच्या कटात पप्या शिंदे या त्यांच्या मित्रांचाच सहभाग असल्याचा आरोपही प्रदीप यांच्या वहिनीनं आणि पत्नीनं केलाय...

दरम्यान पप्या शिंदेनं मित्र असणाऱ्या प्रदीप पूर्णेंकरांच्या हत्येचा कसा कट रचला...पाहूयात...

पप्या शिंदे हा अनेक वर्षांपासून प्रदीप पुर्णेकर यांचा मित्र होता.

ठाणे महापालिका निवडणुकीनंतर काहीतरी बिनसलं आणि दोघं दुरावले

मात्र हत्येच्या 15 दिवस आधी पप्या शिंदेंनं प्रदीप यांच्यासोबत जुळवून घेतलं

प्रदीप यांच्यावर हल्ला झाला तेव्हा पप्या शिंदे कार्यालयातच होता, त्यानेच पूर्णेकरांना रुग्णालयात नेले

हल्ल्याशी कसलाही संबंध नसल्याचं पप्या शिंदे याने भासवलं.

हल्ला होत असताना पप्यावर वार झाला नाही त्याला खरचटलंही नाही, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला

राजकीय वैमनस्य, ड्रग्ज टोळीविरोधातील लढा आणि क्लस्टर योजनेला केलेला विरोध यातूनच पूर्णेकरांचा बळी गेल्याचा दावा आता केला जातोय... आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि फरार आरोपींना पोलीस कधी गजाआड करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com