

कल्पेश गोर्डे
Thane News Today: ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी मोबाईल गेम धर्मांतर प्रकरणी मास्टर माईंड शाहनवाजला अटक केली आहे. शाहनवाझला रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर रात्री उशिरा ठाण्यातील कळवा येथील छ. शिवाजी महाराज रुग्णालय येथे शाहनवाजला मेडिकल साठी घेऊन जाण्यात आले. रात्री उशिरा मेडिकल झाल्यानंतर आज सोमवारी (१२ जून) दुपारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)
न्यायालयाच्या निर्णयानंतर शाहनवाजच्या पुढील तपासाची दिशा ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे आज शहानवाजला पोलीस कोठडी मिळते की त्याला गाझियाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल हे न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे.
शाहनवाज खान याने एक फेक युजर आयडी तयार केले होते आणि त्याच्या मदतीने एक गेम लॉन्च केला होता. या गेममध्ये शाहनवाज हिंदू मुलांना कलमा वाचण्यासाठी तयार करून इस्लाम कबूल करण्यास भाग पडत असल्याचे समोर आले होते. दरम्यान याप्रकरणी मुंब्र्याचे (Mumbra) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट केलं आहे.
जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये काय म्हणाले ?
गाझियाबाद मधील एक अधिकारी म्हणतो कि 400 हिंदूंचे धर्मांतर झालं. ठाणे पोलीस म्हणतात आम्ही यावर काय बोलणार? हा गाझियाबादचा तपास आहे. पण, बदनाम तर मुंब्रा झालं ना. जे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहे.
400 मुलांचे धर्मांतर होतं असेल तर मुंब्रा पोलिसांना कळणार नाही असे नाही. मी ज्या पोलिसांना ओळखतो कि जे कायम सतर्क असतात त्या पोलिसांपर्यंत ही बातमी नक्कीच पोहचली असती. ही बातमी धादान्त खोटी आहे ह्यात वाद नाही. पण ह्याबबताची स्पष्टता आता ठाणे पोलिसांना करावीच लागेल. कारण ह्यामध्ये बदनाम झाला आहे तो इथला हिंदू.
मुंब्रा-कौसा मध्ये हिंदू मुस्लिम गेल्या 700 ते 800 वर्षापासून एकत्र राहतात हा फार जुना इतिहास आहे. तो काही आजचा इतिहास नाही. त्यामुळे हिंदूंना बदनाम करायचं, मुसलमानांना बदनाम करून द्वेष निर्माण करायचा हेच सध्या चालू आहे.
कुठला हिंदू इतका मूर्ख आहे कि 400 च्या संख्येने तो धर्मांतरित होईल. कारण नसताना एका धर्माला बदनाम करायचं आणि दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष निर्माण करायचा ही पद्धत जी काही स्वीकारली जातं आहे; ही माझ्या अंदाजानुसार नियोजनबद्ध आहे. तरी ठाणे पोलिसांनी यामध्ये खरं काय आहे याबाबत लवकरात लवकर स्पष्टता करावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.