Samruddhi Highway Car Accident: समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच! भरधाव कारला भीषण अपघात, 5 जण गंभीर जखमी

Wardha Car Accident: अनियंत्रित कार दुभाजकावर धडकल्याने भीषण अपघात झाला.
Samruddhi Highway Car Accident
Samruddhi Highway Car Accidentsaam tv
Published On

चेतन व्यास, वर्धा

Wardha Accident: समृद्धी महामार्गावर अपघातांची (Samruddhi Highway Accident) मालिका सुरुच आहे. या महामार्गावर सतत अपघाताच्या घटना समोर येत आहेत. शनिवारी या महामार्गावर कारला भीषण अपघात (Car Accident) होऊन चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे. अनियंत्रित कार दुभाजकावर धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

Samruddhi Highway Car Accident
Sharad Pawar Threat Case: मोठी बातमी! शरद पवारांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रविवारी अनियंत्रित कार दुभाजकावर धडकली. येळाकेळी शिवारात हा अपघात झाला. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या कारमधील पाच जणांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Samruddhi Highway Car Accident
Alandi Wari News: आळंदीत वारीमध्ये लाठीचार्ज झाला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

अपघातग्रस्त कार नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जात होती. त्याचवेळी येळाकेळी शिवारात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने पुलाच्या सिमेंट दुभाजकाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. अपघातामध्ये जखमी झालेल्या पाचही जणांना समृद्धी महामार्ग रुग्णवाहिकेच्या मदतीने सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Samruddhi Highway Car Accident
Noida Lighting Truss Falls: फॅशन शोदरम्यान लाइटिंगचा ट्रस पडल्याने मॉडेलचा मृत्यू, फिल्मसिटीमध्ये घडली घटना

दरम्यान, शनिवारी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. हज यात्रेसाठी मुंबई येथून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात निघालेल्या कारचा वैजापूरजवळ अचानक टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन उलटली. या भीषण अपघातात कारमधील एक वर्षांचा चिमुकला जागीच ठार झाला. तर कुटुंबातील इतर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने प्राथामिक उपचारासाठी वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी येवला येथे पाठवण्यात आले.

अख्तर रझा असं मृत्युमुखी पडलेल्या एक वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. तर आझाद अली खान (वय ४९), अफताब अली (वय २४), खुशबू आलम खान (वय २६), यास्मिन खान (वय १८), सोहेल आलम खान (वय ३०) सर्व राहणार वाशी, मुंबई हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कुटुंब हे मूळचे बिहार राज्यातील छप्रा येथील रहिवासी आहेत. ते सध्या नवी मुंबईतल्या वाशी परिसरात राहत होते. हज यात्रेला जाण्यासाठी ते गावाकडे निघाले होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com