ठाण्यात ओला चालकाची गुंडगिरी, थुंकण्याला विरोध केला, वृद्धाचा पाय तोडला, मुजोर भैय्यांचा माज कोण उतरवणार?

Thane Ola Driver Assault Elderly Cleanliness Dispute: परप्रांतीयांची मुजोरी आणि दादागिरी किती टोकाला पोहोचलीये हे दाखवणारी अत्यंत संतापजनक घटना घडलीय. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा आग्रह केल्यामुळे एका परप्रांतीय ओला चालकानं जे कृत्य केलंय ते तुम्हालाही हादरवून सोडणारं आहे.. पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट...
Elderly man injured after being attacked by a cab driver in Thane; incident caught on camera and went viral.
Elderly man injured after being attacked by a cab driver in Thane; incident caught on camera and went viral.saam tv
Published On

महाराष्ट्रात मुजोर परप्रांतियांची दादागिरी वाढलीये. मंगळवारी रात्री घ़डलेल्या घटनेनंतर तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. असं आम्ही का म्हणतोय, तर त्यासाठी हा व्हिडीओ पुर्ण पाहा..

या जेष्ठ नागरिकाला आणि त्याच्या पत्नीला ही मारहाण का होते कुठे होते असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर पाहा.

ठिकाण - विवियाना मॉलसमोर, ठाणे

वेळ - रात्री ८ वाजता

ठाण्यातलं हे वृद्ध दाम्पत्य संध्याकाळी फेरफटका मारत असतांना हा निशांत शुक्ला नावाचा परप्रांतिय ओला चालक त्यांच्या जवळ थुंकत होता. यावेळी त्यांनी त्याला हटकलं आणि रस्तावर घाण करु नको असं म्हणताच या गुंड ओला चालकानं भर रस्त्यात या दाम्पत्यावर हल्ला चढवला. हातात दगड घेऊन त्या वृद्ध व्यक्तीवर तो धावून आला त्याचवेळी तिथल्या काही लोकांनी त्याला अडवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या ओलाचालकाच्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीच्या पायाला गंभीर इजा झाल्याचं दृष्यांमध्ये दिसतंय. या घटनेचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर दोन्ही सेनेच्या शिवसैनिकांनी मात्र अवघ्या ४ तासांत या मुजोर ओला चालकाला शोधून त्याला शिवसेना स्टाईल धडा कसा शिकवला पाहा,

आता यात मनसेनंही उडी घेतली असून मुजोर परप्रांतीयांना धडा शिकवणार असल्याचा इशारा मनसे नेत्यांनी दिलाय. या व्हिडीओची दखल खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली तर मनसेनं परप्रांतियांच्या मुद्द्याला हात घातलाय. सरकारला सवाल केलेत.

या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलसमोरून परप्रांतीय चालकांना अक्षरशः पिटाळून लावलंय. अनेकांच्या उपस्थितीत ही मारहाण होत असतांनाही बघ्यांनी त्याला का रोखलं नाही. हा देखिल एक प्रश्न आहेच. कुठे मराठी नोकऱ्या नाकारण, कुठे मराठीत बोलण्यास नकार देणं, कुठे सोसायटीत पांढऱ्या पट्ट्या मारणं, त्यामुळे हा मुजोर माज आता वेळीच ठेचला गेला पाहिजे. या गुंडप्रवृत्तीच्या महाराष्ट्रद्रोह्यांना धडा शिकवायलाच हवा अन्यथा कायद्या सुव्यवस्थेचे तीन-तेरा झाल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com