Tragedy News : दहावीच्या परीक्षेसाठी मुलीला शुभेच्छा दिल्या, बस स्टॉपवरच वडिलांचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Thane City News : दहावीच्या परीक्षा सुरु झाल्याने मुलीला भेटायला आलेल्या वडिलांचा बस स्थानकावर मृत्यू झाला. ही घटना ठाण्यात वंदना एसटी बस स्थानकावर घडली आहे. या प्रकरणाचा तपास नौपाडा पोलीस करत आहेत.
Thane News
Thane NewsMeta Ai
Published On

Thane : चांगला पेपर सोडव, घाबरुन दडपण घेऊ नको असे म्हणत दहावीतल्या मुलीला धीर देणाऱ्या वडिलांचा ठाण्यातल्या एसटी बस स्थानकावर मृत्यू झाला. बस स्थानकाच्या आरक्षण खिडकीजवळ त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळला. प्राथमिक तपासातून हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ठाण्यातल्या वंदना एसटी बसस्थानकाजवळ घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव संग्राम शिंदे असे आहे. ते साताऱ्यातल्या कोरेगावात राहतात. ठाण्यातल्या यशोधननगर येथे शिंदे यांचे नातेवाईक राहतात. शिंदे यांची दोन्ही मुलं ठाण्यात नातेवाईकाकडे शिक्षण घेत आहेत. संग्राम शिंदे यांची मुलगी दहावीत, तर मुलगा चौथीत आहेत. मुलीची दहावीची परीक्षा सुरु असल्याने तिला भेटण्यासाठी शिंदे हे ठाण्यात आले होते.

दोन्ही मुलांना भेटून ते ठाण्याहून परत साताऱ्याला गावी जाण्यासाठी निघाले. मध्यरात्री साडेबारा वाजताची बस ते ठाण्याच्या वंदना बसस्थानकातून पकडणार होते. बसची वाट पाहत असताना त्यांचा अचानक मृत्यू झाला. वंदना बसस्थानकात सुरक्षाव्यवस्था नसल्यामुळे शिंदे पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्या परिसरात अनेक गर्दुल्ले पडलेले असतात. शिंदे जेव्हा कोसळून खाली पडले, तेव्हा त्यांच्याबाबत गैरसमज झाल्याने कोणाचेही त्यांच्याकडे लक्ष गेले नाही.

Thane News
Datta Gade Case: फक्त स्वारगेटच नाही तर राज्यातील ५ बस स्थानकावर दत्ता गाडेचा मुक्त वावर, तपासातून धक्कादायक माहिती उघड

मध्यरात्री दीडच्या सुमारास पुकार सेवा प्रतिष्ठानचे हेमंत जोशी यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत पुढील तपासासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. डॉक्टरांनी हृदयविकारामुळे शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणासंबंधित तपास नौपाडा पोलिसांकडून केला जात आहे.

Thane News
Pune Crime: गडावर रोमान्स करताना हटकलं, दुर्गप्रेमीला दगडानं ठेचलं; प्रेमी युगुल अटकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com