Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

MNS Raj Thackeray vs Shiv Sena Eknath Shinde : मनसे पदाधिकाऱ्याने शिंदे आणि अमित शाह यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट शेअर केली. शिवसैनिकाने भावनांवर आघात झाल्याची तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदवला गेला आहे.
एकनाथ शिंदे
Raj Thackeray Vs Eknath Shinde
Published On

अभिजित देशमुख, कल्याण प्रतिनिधी

MNS worker booked after sharing controversial meme of Eknath Shinde : कल्यामधील मनसे पदाधिकाऱ्याने शिवसेना प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केली आहे. दिल दोस्ती दुनियादारी या व्हॉट्सच्या ग्रुपमध्ये त्याने एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केला. त्याच ग्रुपमधील शिवसैनिकाकडून याचा तीव्र विरोध करण्यात आला. तो थेट पोलीस ठाण्यात पोहचला अन् मनसैनिकावर गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ शिंदे अमित शाह यांच्या पायाशी बसलेले कार्टून पोस्ट केल्याप्रकरणी शिवसैनिकाच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत त्याने म्हटले आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. रोहन पवार असे गुन्हा दाखल झालेल्या मनसे पदाधिकार्याचे नाव आहे.

३७ वर्षीय स्वप्नील भाऊराव एरंडे असे तक्रार करणाऱ्या शिवसैनिकाचे नाव आहे. दिल दोस्ती दुनियादारी या व्हॉट्सअॅप ग्रुमचा सदस्य आहे. याच ग्रुपमधील रोहन पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याचं तक्रारीत म्हटले आहे. स्वप्नील आणि रोहन हे मागील पाच वर्षांपासून एकमेंकाना ओळखतात. स्वप्नील हा शिवसैनिक आहे, तर रोहन हा मनसैनिक आहे. दोघांमधील मैत्रीमध्ये आता मिठाचा खडा पडलाय. शिंदेंवर केलेल्या पोस्टमुळे स्वप्नील यांच्या भावना दुखावल्या, त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

एकनाथ शिंदे
Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरातचा नारा दिला होता. त्यानंतर रोहन पवार यांनी एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केली. भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह खुर्चीवर बसलेले आहेत, पायाजवळ एकनाथ शिंदे बसेलले अन्.... असल्याचे फोटोमध्ये दाखवण्यात आले. रोहन यांना मी फोन करून पोस्ट डिलिट करण्यास सांगितली. पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे रोहन यांची तक्रार रवी पाटील आणि अरविंद मोरे यांच्याकडे केली. त्याशिवाय पोलिसांतही तक्रार दिल्याचे स्वप्नीलने म्हटले आहे.

एकनाथ शिंदे
महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com