Dombivli Fraud News: एक क्लिक अन् क्षणात १२ लाख गमावले; नोकरीचे आमिष दाखवून डोंबिवलीतील महिलेची फसवणूक

Woman Loses Rs 12.5 lakh: पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवून ३३ वर्षीय महिलेची तब्बल १२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार डोंबिवली परिसरात घडला आहे.
Online Fraud
Online FraudSaam tv
Published On

Thane Dombivli Fraud News: पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवून ३३ वर्षीय महिलेची तब्बल १२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार डोंबिवली परिसरात घडला आहे. श्रिया गंगाधर खडगी असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव असून या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Online Fraud News)

Online Fraud
Amravati News : आणखी किती जणांचा जीव जायची वाट पाहात आहात? टाकरखेडा मोरे- पांढरी रस्त्याच्या प्रश्नावरुन ग्रामस्थ आक्रमक

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गरीबाचापाडा (GaribachaPada) परिसरात राहणारी तरुणी श्रिया गंगाधर खिडगी ही मुंबईत (Mumbai) एका खासगी कंपनीत काम करते. अतिरिक्त उत्पन्नाच्या शोधात तिने ऑनलाइन साईडवर पार्ट टाईम जॉब शोधायला सुरुवात केली. एका ऑनलाईन भामट्याने त्यांच्याशी संपर्क करत आमच्याकडे जॉब असल्याचे सांगितले.

या आमिषाला बळी पडून तक्रारदार महिलेने नोकरीची ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण केली. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होती. सायबर चोरट्यांनी तिला टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आणि प्रत्येक कामासाठी पैसे कमवून विविध सोशल मीडिया लिंक्ससह व्यस्त राहण्याची सूचना केल्या.

Online Fraud
Manoj Jarange Patil Protest: जीआर काढले, पण सरकारच्या २ गोष्टी मनोज जरांगेंना खटकल्या; उपोषणावर ठाम

सुरुवातीला तक्रारदार महिलेने थोडी रक्कम दिली आणि चांगले उत्पन्न मिळाले. या नोकरीवर तिचा विश्वास वाढल्याने तिने 12.5 लाख रुपये भरून गुंतवणूक करणे सुरू ठेवले. मात्र यानंतर तिला तिच्या गुंतवणुकीवर कोणतेही पेमेंट किंवा परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. विष्णुनगर ठाण्याचे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com