फय्याज शेख, भिवंडी प्रतिनिधी
Kohinoor Apartment Collapse death Toll : भिवंडीतील नारपोली परिसर मंगळवारी रात्री एका भीषण दुर्घटनेने हादरला. गंगाराम वाडी येथील 'कोहिनूर अपार्टमेंट' या तळ अधिक चार मजली इमारतीचा अर्धा भाग अचानक कोसळला. या दुर्दैवी घटनेत २ नागरिकांचा मृत्यू झाला असून 7-8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीचा पिलर (खांब) अत्यंत धोकादायक झाला होता. त्यामुळे तिथे रात्रीच्या वेळी दुरुस्तीचे काम सुरु होते. रात्री ८ वाजता इमारत एका बाजूने झुकत असल्याचे स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आले. स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बहुतांश कुटुंबांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मात्र, एवढा धोका असूनही काही नागरिक पुन्हा इमारतीत गेले होते. तर पिलरचे काम करणारे मजूरही तिथे उपस्थित होते. अचानक इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याने हे सर्व जण ढिगाऱ्याखाली अडकले.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून NDRF च्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.