ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Accident Video : मुंब्रा येथील एमएम व्हॅली परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
Accident Video :
CCTV footage captures the tragic moment of a fatal accident in Mumbra where two youths lost their lives.saam tv
Published On
Summary
  • मुंब्रा येथे बस ओव्हरटेक करताना भीषण अपघात

  • दुचाकीवरील तिघे बसखाली आल्याने दोन जणांचा मृत्यू

  • ट्रिपल सीट आणि ओव्हरटेकमुळे अपघात घडल्याची माहिती

विकास काटे, साम प्रतिनिधी

बसला ओव्हरटेक करताना दोन जण चाकाखाली चिरडून ठार झाल्याची घटना ठाण्यातील मुंब्य्रात घडली आहे. दुचाकीने ट्रिपल सीट जाणाऱ्यांना स्कुल बसला ओव्हरटेक करणं महागात पडलंय. या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंब्रा येथील एमएम व्हॅली परिसरात ही अपघाताची घटना घडली आहे.

Accident Video :
Parbhani Accident : झरी-जिंतूर मार्गावर हिट अँड रन; भीषण अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेली दुचाकी अचानक घसरली. तोल गेल्यामुळे दुचाकीवरील तिघेही बसच्या संपर्कात आले. यामध्ये पुढील आणि मागील चाकाखाली आल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत युवकांची ओळख पटली असून दोघेही मुंब्रा येथील रहिवासी आहेत.

Accident Video :
Accident News : अमरावतीत भीषण अपघात! भरधाव कारने दुचाकीला उडवलं, तिघांचा जागीच मृत्यू

अविनाश दवंडे (वय 20), संगम फुलशेरे (वय 17) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. हे दोघेही ठाकूरपाडा, येथे राहत होते. तर तिसरा महेश वारे (वय 18) हा गंभीर जखमी असून, त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या मुंब्रा येथील हकीम हजमल खान रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताची दृश्य कैद

फुटेजमध्ये दिसत आहे की, दुपारची वेळ आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ आहे. डाव्या बाजुकडून एका शाळेची बस येताना दिसते. त्याचवेळी ट्रिपल सीट असलेले दुचाकीस्वार वेगात बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. बसच्या पुढे जाताना दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि बाईक बसच्या खाली आली. बस चालकाला याची काहीच कल्पना नसते. तो तशाच बस पुढे घेऊन गेला. लोकांनी आराडाओरड केल्यानंतर बस चालक गाडी थांबवतो. दरम्यान दुचाकी चाकाखाली आल्यानंतर चालकाचं बसवरील निंयत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या इतर दुचाकींना धडकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com