शिक्षकांसाठी मोठी बोतमी! TET गैरप्रकारातील शिक्षकांना दिवाळीपूर्व वेतन मिळणार

राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) गैरप्रकार केलेल्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याची कारवाई करण्यात आली होती.
TET Exam Scam News
TET Exam Scam NewsSaam TV
Published On

पुणे : राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) गैरप्रकार केलेल्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता ही वेतन स्थगितीची कारवाई थांबवण्यात आली असून कार्यरत शिक्षकांना दिवाळीपूर्व (Diwali) वेतन देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिले आहेत.

या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाच्या (High Court) अंतरीम आदेशानुसार शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार केलेल्या कार्यरत शिक्षकांचे वेतन थांबविण्याची कारवाई करण्यात आलेल्या शिक्षकांना दिवाळीपुर्व वेतन देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिले आहेत.

TET Exam Scam News
Shivraj patil chakurkar : श्रीकृष्णांनी देखील अर्जुनाला जिहाद शिकवला; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद

त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिक्षंकांना हा मोठा दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहे. शिवाय आता टीईटी गैरप्रकार प्रकरणी कारवाईला देखील स्थगिती मिळणार का की काय अशा देखील चर्चा सुरु झाल्या आहेत.

काय आहे प्रकरण -

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटीमध्ये गैरप्रकार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. या घोटाळ्यात जवळपास 7 हजार 874 उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने जाहीर केली होती. त्या यादीतील अनेक शिक्षकांचे मानधन स्थगित करण्यात आलं होतं. या कारवाईमध्ये सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचाही समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com