Shivraj patil chakurkar : श्रीकृष्णांनी देखील अर्जुनाला जिहाद शिकवला; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद

Congress Leader: 'केवळ कुराण आणि बायबलमध्ये (Quran and Bible) जिहाद नसून श्रीकृष्णही अर्जुनाला जिहाद सांगायचे'
Shivraj patil chakurkar
Shivraj patil chakurkarSaam TV
Published On

Shivraj patil chakurkar : काँग्रेस नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. चाकूरकर (Shivraj patil chakurkar) यांनी दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला असल्याचं वक्तव्य केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुत्ववाद्यांच्या भावना चांगल्याच दुखावल्या आहेत. तर काँग्रेसने (Congress) या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात असल्याचं म्हटलं आहे. शिवाय शिवराज पाटील यांनी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानी अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केली आहे.

तसंच केवळ कुराण आणि बायबलमध्ये (Quran and Bible) जिहाद नसून श्रीकृष्णही अर्जुनाला जिहाद सांगायचे, या आशयाचं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. तर पाटील यांनी बायबल आणि गीता यांची तुलना केली आहे.

काय म्हणाले चाकूरकर?

कार्यक्रमामध्ये बोलताना शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, मनामध्ये कोणतीही किल्मिष नसतानासुद्धा एक मन सांगतं गोष्टी योग्य आहे, तर दुसरं मन सांगतं गोष्टी अयोग्य आहेत. या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करताना जेव्हा शक्तीचा वापर करावा लागतो, तेव्हा तो करावाच लागतो. हे फक्त कुराणमध्येच नाही तर गीतेमध्येही सांगण्यात आलं आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणातच नाही तर तो येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्ये देखील आहे आहे.

इटालीयन विचारधारा - भाजप

Shivraj patil chakurkar
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

पाटील यांच्या या वक्तव्यावर भाजप चांगलीच आक्रमक झाली असून भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी या प्रकरणावरुन काँग्रेसवर टीका केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, या सगळ्यांमध्ये इटालीयन विचारधारा रुजवण्यात आली आहे, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा DNA इटालीयन करून घेतला आहे. यापेक्षा दुर्देवी वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांकडून अपेक्षित नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या संस्कृती, दैवतांची विटंबना करण्याच्या वृत्तीची लाज वाटते.

बौद्धिक दिवाळखोरीची लाज वाटते - काँग्रेस

तर भाजप नेत्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची लाज वाटते, जिहादचा खरा अर्थ संघर्ष आहे, स्वतःच्या शुद्धीसाठी केलेला संघर्षला देखील जिहाद म्हटलं जातं. धर्माच्या अधर्माविरोधच्या लढाईला देखील जिहाद म्हटलं जातं असं म्हणत काँग्रेस नेत सचिन सावंत यांनी पाटील यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com