मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर दहशतवादाचं सावट असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत मुंबईत संशयास्पद हालचाली सुरु आहेत. खलिस्तान समर्थकांकडून 'खून का बदला खून'ची मोहिम सुरु झाल्याची माहिती तपास यंत्रणेंना मिळालीय.
राहुल गांधी हे ११ जानेवारी रोजी ज्यावेळी डोक्यात पंजाबी पगडी घालून सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी खलिस्तानी फुटीरतावादी नेता आणि दहशतवादी गुरपतवंत सिंग याने 'खून का बदला खून'चे आवाहन केले. ज्यामुळे चेंबूर येथील एका गुरूद्वारा परिसरात आणि वडाळा येथील भक्तीपार्क येथे राहुल गांधी विरोधात पोस्टरबाजी झाली.
या पोस्टरवर जेलमध्ये बंद असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांना सोडण्याचीही मागणी करण्यात आली होती. तपास यंत्रणांनी तातडीन ते पोस्टर हटवले खरे मात्र पोस्टर लावणारे आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले असून त्यांचा शोध सुरू आहे.
मुंबईतील खलिस्तान समर्थक चळवळीशी संबंधित अनेक लोकांचा सहभाग या घटनेमागे आढळून आला आहे. तपास यंत्रणा मुंबई पोलिसांच्या मदतीने संशयित व्यक्तीचा शोध घेत आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार यामागे खलिस्तान फुटीरतावादी नेता आणि दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा हात असल्याचे सांगितले जात आहे. (Latest Marathi News)
शिख फॉर जस्टिस मुव्हमेंट या बंदी घातलेल्या संघटनेचा तो प्रमुख असून वेगळ्या खलिस्तानच्या मागणीसाठी परदेशात राहून आयएसआयच्या इशाऱ्यावर भारतात ते दहशतवादी कारवाया करतात.दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या या छुप्या आव्हानाला पाठिंबा देणार्या पंजाबमधील आणखी एका संघटनेचे नावही समोर आले आहे. 2022 मध्ये या संघटनेच्या संशयावरून त्या संघटनेची चौकशी सुरू असल्याचे समजले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.