Jagdish Gaikwad : मुंबई पोलिसांकडून पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना अटक; काय आहे प्रकरण?

पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना पुन्हा एकदा पोलिासांनी अटक केली आहे
jagdish gaikwad
jagdish gaikwad twitter

Jagdish Gaikgwad News : पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना एकदा पोलिासांनी अटक केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक झाली आहे. मुंबईतील चुन्नाभट्टी पोलिसांनी गायकवाड यांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

jagdish gaikwad
Pune : मुंबई पाठोपाठ पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका ईडीच्या रडारवर; कोरोना काळात हेराफेरी झाल्याचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चुनाभट्टी येथे पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड (Jagdish Gaikwad) हे काल रात्री 12.30 च्या सुमारास चेंबूर येथील हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी जगदीश गायकवाड यांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं.

हॉटेलमध्ये जगदीश गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. प्रकाश आंबेडकर यांच्यावर जगदीश गायकवाड यांनी वादग्रस्त टिप्पणी केल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांनी घेरलं. यावेळी जगदीश गायकवाड यांच्यावर कार्यकर्त्यांनी इतरही अनेक आरोप केले.

यावेळी गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाकडे बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्त्यांनी जगदीश गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली. या संपूर्ण घटनेनंतर चुनाभट्टी पोलिसांनी (Police) घटनास्थळ गाठून जगदीश गायकवाड यांना तेथून हटवले. त्यानंतर जगदीश गायकवाड यांना चुनाभट्टी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आता गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे.

jagdish gaikwad
Mumbai News: मुंबईतील झवेरी बाजारात 'स्पेशल 26'; बोगस ईडी अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींची लूट

नेमकं काय आहे प्रकरण ?

पनवेलचे (Panvel) माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती. यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर पनवेलमधील कळंबोली पोलीस ठाण्यात जगदीश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जगदीश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना कळंबोली पोलिसांनी अटक होती. पोलिसांनी गायकवाड यांना अटक करून त्यांना पनवेल कोर्टात हजर केले. त्यानंतर पनवेल कोर्टात जगदीश गायकवाड यांना जामीन मिळाला होता. जामीनावर बाहेर असलेले जगदीश गायकवाड यांना मुंबईच्या चुनाभट्टी पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com