Pune News : मुंबई पाठोपाठ आणखी दोन महापालिकेकडून ईडीने माहिती मागवली आहे. कोरोना काळात हेराफेरी झाल्याचा संशय ईडीला आल्याने आणखी दोन पालिका ईडीच्या रडारवर आहेत. ईडीकडून पुणे पालिका आणि पिंपरी-चिंचवड पालिका या दोन महापालिकेची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
कोरोना काळात जम्बो कोविड सेंटर चालविण्यासाठी दिलेल्या कंत्राटाची माहिती पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे मागितल्याची माहिती आहे. मुंबई पालिकेकच्या कोविड सेंटरबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्याननंतर ईडीने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना समन्स बजावलं होतं.
मुंबई महापालिकेनंतर आता पुणे महापालिका (PMC) आणि पिंपरी चिंचवड महापालिका ईडीच्या (Ed) रडारवर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे महापालिका कोविड सेंटर प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वीच तक्रार केली होती. या तक्रारीनंतर महापालिकेची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. जम्बो कोविड सेंटर प्रकरणी एका चहा वाल्याच्या नावाने कंत्राट घेतल्याचा सोमय्या यांचा आरोप होता.
पुण्यात रॅपिड अँटिजन किटने खोटे रेकॉर्ड तयार केल्याच्या आरोप झाल्यानंतर पुणे महापालिकेकडून चौकशीही झाली. आता या सर्व प्रकरणात ईडीने विशेष लक्ष दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना समन्स बजावण्यात आले होते. ईडीने इक्बाल सिंह चहल यांची एक तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.