पुण्यात आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण कारवाई; मोठा तणाव (पहा व्हिडिओ)

गेल्या वर्षी पूर आलेल्या आंबिल ओढ्याच्या काठावरची अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महापालिकेतर्फे सकाळपासून सुरु करण्यात आली असून स्थानिक नागरिक यामुळे संतप्त झाले आहेत
गेल्या वर्षी पूर आलेल्या आंबिल ओढ्याच्या काठावरची अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महापालिकेतर्फे सकाळपासून सुरु करण्यात आली  आहे
गेल्या वर्षी पूर आलेल्या आंबिल ओढ्याच्या काठावरची अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महापालिकेतर्फे सकाळपासून सुरु करण्यात आली आहे- सागर आव्हाड
Published On

पुणे : गेल्या वर्षी पूर Flood आलेल्या आंबिल ओढ्याच्या काठावरची अतिक्रमणे Encrochment हटविण्याची कारवाई महापालिकेतर्फे PMC सकाळपासून सुरु करण्यात आली असून स्थानिक नागरिक यामुळे संतप्त झाले आहेत. या कारवाईवरुन Action स्थानिक नागरिक आणि पोलिसांमध्ये Police वाद झाल्यानंतर या ठिकाणी तणावाचे वातावरण पसरले आहे. या कारवाई दरम्यान एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचाही प्रयत्न केला आहे. Tension in Pune Ambil Odha area over Anti Encrochment Drive

आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पक जाहीर करून पालिकेने आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. खाजगी बिल्डरच्या आर्थिक फायद्यासाठी आंबिल ओढ्याची मोक्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचे कट कारस्थान प्रशासन आधिकारी स्थानिक लोकप्रतिनीधी करत असल्याचेही या नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, पुणे प्रकरणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बोलावली आहे. या बैठ बैठकीला नगरविकास खात्याचे सचिव,पुणे आयुक्त, महापालिकेचे अधिकारी, एसआरए अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही बैठक आॅनलाईन होणार आहे.

गेल्या वर्षी पूर आलेल्या आंबिल ओढ्याच्या काठावरची अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महापालिकेतर्फे सकाळपासून सुरु करण्यात आली  आहे
सिडको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सज्ज

या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सकाळपासून कारवाई सुरु असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या कारवाईची कुठलीही पूर्वसूचना महापालिकेने दिली नाही असाही आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबतची नोटीस ही बिल्डरच्या लेटरहेडवर काढली असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. आता या प्रकरणाला आता राजकीय स्वरुप येऊ लागले आहे. यात आर्थिक गैरव्यवहार असल्याचा काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी आरोप केला आहे.

''कायद्यातील या तरतुदीनुसार आंबिल ओढ्यासारख्या मोठ्या ओढ्यांच्या कडेने महापालिका आणि हद्दीलागतच्या भागात दोन्ही बाजूस ९ मीटर रुंदीचा ग्रीनबेल्ट ठेवणे बंधनकारक केले आहे. मात्र, आंबिल ओढ्याच्या कडेने नऊ मीटर ग्रीनबेल्ट सोडाच, ओढ्यातच भर टाकून अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याची मूळ वहनक्षमता जवळपास साठ टक्क्यांनी कमी झाली आहे. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पक जाहीर केला आहे. ही किमया एखाद्या बांधकाम व्यावसायिकाप्रमाणे खुद्द महापालिका विकासाच्या नावाखाली करत आहे,'' असा आरोप बहुजन एकता परिषदेचे किशोर कांबळे यांनी केला आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com