सिडको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सज्ज
सिडको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सज्जसाम टिव्ही

सिडको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सज्ज

विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नांव देण्यासाठी करण्यात येत असलेल्या सिडको आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करत आज सकाळपासून ट्रॅफिक विभागाने आपली तयारी केली आहे

नवी मुंबई : विमानतळाला Airport स्व. दि. बा. पाटील De Ba Patil यांचे नांव देण्यासाठी करण्यात येत असलेल्या सिडको CIDCO आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करत आज सकाळपासून ट्रॅफिक Traffic विभागाने आपली तयारी केली आहे. Police Bandobast for Cidco Agitation in Navi Mumbai

सिडको कार्यालय सायन पनवेल महामार्गा लगत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग विशेष प्लॅन तयार करत सज्ज झाले आहे. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत नवी मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक वेगळ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.

नवी मुंबईतील सिडको कार्यालयाला प्रकल्पग्रस्त घेराव घालणार आहेत.त्यापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी सिडको कार्यालय आणि परिसराची पाहणी केली.यावेळी आंदोलन कर्त्यांना जमाव न करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मुंबईत निर्माण होऊ नये नवी मुंबई शहराला गालबोट लागू नये अशी विनंती ही पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी केली आहे.

सिडको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सज्ज
आघाडीतील ओबीसी नेते 'काका-पुतण्यां'च्या ताटाखालचे मांजर - पडळकर

नवी मुंबईतील घेराव आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी व्यूह रचना केली आहे. प्रत्येक स्पॉट वर 1 डीसीपी, 1 एसीपी,दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांनतर आवश्यक नुसार पोलीस कर्माचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त, स्थानिक पोलीस उपायुक्त हे स्पॉट वर फिरते राहणार आहेत. नवी मुंबई महापालिका मुख्यालय,सायन पनवेल महामार्गावर खारघर येथे, सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे पोलीस बंदोबस्तासह राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण दल तैनात करण्यात आले आहे.

Edited By- Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com