Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Mumbai News: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात झाला असून यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी
Mumbai AccidentSaam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव या ठिकाणी भरधाव वेगाने जात असलेला टेम्पो पलटी झाल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. या अपघातामुळे बोरिवलीकडून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गोरेगाव ते मालाड दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यावर मोठा प्रमाणात ऑइल पडल्यामुळे पोलीस टेम्पो आणि ऑइल काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करत आहेत.

वाहतूक पोलिसांनी क्रेन मागवून हायवेवरून टेम्पोला बाजूला काढलं आहे. या अपघातात टेम्पोचालक जखमी झाला आहे. जखमी टेम्पो चालकाला जवळचा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ऑइल सांडले आहे. ऑइलवर माती टाकण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी
Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

पुण्यातही आज एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचा पती या अपघातात जखमी झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. ही घटना पुणे नगर महामार्गावर सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सिरीचंदना विश्वनाथ हेवटम, असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव तर त्यांचे पती विश्वनाथ हे जखमी आहेत.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी
Arabian Sea Shiv Smarak : 8 वर्ष झाली, स्मारक दुर्बिणीतूनही दिसत नाही; अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ पती पत्नी व त्यांचे मित्र असे दोन दामत्य सकाळी बॅडमिंटन खेळण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना अपघात होण्याच्या आधी दोन्ही दाम्पत्याने घटना स्थळाच्या अलीकडे नाश्ता केला. तेथून निघताच पुढे काही अंतरावर विश्वनाथ यांच्या दुचाकीला भरघाव डंपरने धडक दिली. यामध्ये सिरीचंदना या डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com