Anil Parab
Anil ParabSaam TV

ST Strike: 'जे ST कर्मचारी ऐकत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा, परिवहन आयुक्तांच्या सूचना'

'ज्या गोष्टी ST कर्मचाऱ्यांना (ST Employee) अपेक्षित होत्या त्या आम्ही दिल्या आहेत. आज जनतेचे हाल होत आहेत.'
Published on

सुशांत सावंत -

मुंबई : कोकणातील (Kokan) लोकांना कोकणात जाता येईल याची आम्ही काळजी घेत असून एसटीची वाहतूक सुरू होत असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली. तसंच एसटी कामगारांनी पुन्हा कामावर यावे असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ते म्हणाले, आम्ही स्वतःहुन पगार वाढ दिली होती. ज्या गोष्टी ST कर्मचाऱ्यांना (ST Employee) अपेक्षित होत्या त्या आम्ही दिल्या आहेत. आज जनतेचे हाल होत आहेत. तरी कर्मचारी ऐकत नाहीत अशी खंत अनिल परब यांनी व्यक्त केली.

दरम्यान, एसटी विलीनीकरनाबाबत 22 तारीखला निर्णय आहे त्यानंतर जे ऐकत नाही त्यांच्यावर कारवाई करा अशा परिवहन आयुक्तांनी सूचना दिलेल्या आहेत असही त्यांनी सांगितलं.

Anil Parab
...म्हणून 31 जवानांना मारलेल्या, 20 लाखांचं बक्षीस असलेल्या नक्षली जोडप्याने केलं आत्मसमर्मण

यावेळी 12 आमदारांच्या प्रकरणावरती ते राज्यपालांचे अधिकार आहेत पण आम्ही त्यांना सांगण्याचे काम करत आहोत राज्यपालांनी 12 अमादर नियुक्ती करायला हवी, विधानसभा अध्यक्ष निवडणुक देखील झाली पाहिजे असही परब यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com