Ranjit Kasale: मोठी बातमी! निलंबित PSI रणजित कासलेंना बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात

Ranjit Kasale in Custody: बीडचे निलंबित पीएसआय रणजित कासले यांना अखेर बीड पोलिसांनी आज पहाटे ताब्यात घेतलं. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये असणारे रणजित कासले काल रात्री पुण्यात आले. पुणे एअरपोर्टवर येताच त्यांनी अनेक गंभीर आरोप केले होते.
Ranjit Kasale: मोठी बातमी! निलंबित PSI रणजित कासलेंना बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात
Beed Police Rajeet KasaleSaam Tv
Published On

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर देण्यात आली होती, असा दावा करून खळबळ उडवून देणाऱ्या बीडचे निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेंना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीड पोलिसांनी रणजित कासले यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं. रणजित कासले गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. दोन दिवसांपूर्वी रणजित कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत लवकरच मी शरण येणार असल्याचे सांगितले होते. अखेर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित पीएसआय रणजित कासले यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कासलेंना ताब्यात घेतलं. काल ते दिल्लीवरून पुण्यात आले. पुणे एअरपोर्टबाहेर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर ते पुण्यातील एका हॉटेलवर मुक्काम करायला गेले. पत्रकारांशी संवाद साधताना रणजित कासले यांनी पुन्हा गंभीर आरोप केले होते.

Ranjit Kasale: मोठी बातमी! निलंबित PSI रणजित कासलेंना बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात
Ranjit Kasale : कराडचं एन्काऊंटर ते विधानसभा निवडणुकीत EVMशी छेडछाड; सस्पेंड PSI रणजित कासलेंची A टू Z माहिती

पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असं रणजित कासले यांनी सांगितलं होतं. पण ते पुणे पोलिसांकडे शरण आले नाही. शेवटी आज पहाटे रणजित कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आता पोलिस रणजित कासले यांना चौकशीसाठी बीडला घेऊन जाणार आहेत.

Ranjit Kasale: मोठी बातमी! निलंबित PSI रणजित कासलेंना बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात
Beed Ranjit Kasale: बीडचा पोलीस आहे की भिकू म्हात्रे, निलंबित रणजीत कासलेंचा नवा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, निलंबित पीएसआय रणजित कासले गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचे नाव घेत अनेक गंभीर आरोप करत होते. मला वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असा मोठा दावा त्यांनी केला होता. तसंच, 'मी जे पुरावे मी सादर करतोय मला त्याबाबत विचारावे. ज्या दिवशी मतदान होतं. त्या दिवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये आले.', असा मोठा दावा देखील रणजित कासले यांनी केला होता.

Ranjit Kasale: मोठी बातमी! निलंबित PSI रणजित कासलेंना बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात
Ranjit Kasale: 'मी लवकरच शरण येतोय, केलेले सर्व आरोप सिद्ध करून दाखवणारच'; रणजित कासलेंच्या नव्या व्हिडिओने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com