Ranjit Kasale: 'मी लवकरच शरण येतोय, केलेले सर्व आरोप सिद्ध करून दाखवणारच'; रणजित कासलेंच्या नव्या व्हिडिओने खळबळ

Suspended PSI Ranjit Kasale to Surrender: बीडचे निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी लवकरच शरण येणार असल्याचे सांगितले. तसंच, केलेले सर्व आरोप सिद्ध करून दाखवतो असेही ते म्हणाले.
Ranjit Kasale: 'मी लवकरच शरण येतोय, केलेले सर्व आरोप सिद्ध करून दाखवणारच'; रणजित कासलेंच्या नव्या व्हिडिओने खळबळ
Beed Police Rajeet KasaleSaam Tv
Published On

बीडचे फरार निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले बीड पोलिसांसमोर शरण येणार आहेत. रणजित कासले यांनी सोशल मीडियावर नवा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी मी बीड पोलिसांसमोर शरण येणार असल्याची माहिती दिली. कालच रणजित कासले यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत मला पकडूनच दाखवा असे आवाहन पोलिसांना केले होते. पण आता त्यांनी मी शरण येणार असल्याचे सांगितले आहे.

रणजित कासले यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की, 'मी कालपासून माझ्या कमेंट्स वाचल्या त्यानंतर मी काही पत्रकार मित्र, वकील आणि काही पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मला असे जाणवले की पळून काही उपयोग होणार नाही. मी आजपर्यंत कुठल्याही संकटाचा आजपर्यंत सामना केला आहे. त्याप्रमाणे मी आता याला देखील सामोरे जाणार आहे. मी महाराष्ट्र पोलिस आणि बीड पोलिसांसमोर सरेंडर होण्याचा निर्णय घेतला आहे. कारण सिस्टिमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवले आहे.'

Ranjit Kasale: 'मी लवकरच शरण येतोय, केलेले सर्व आरोप सिद्ध करून दाखवणारच'; रणजित कासलेंच्या नव्या व्हिडिओने खळबळ
Walmik Karad: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, धनंजय मुंडेंनी दिली वाल्मिक कराडची सुपारी?

रणजित कासले यांनी पुढे सांगितले की, 'मी लवकरच माझे दोन्ही मोबाईल चालू करणार आहे. मला कॉल करून त्रास देऊ नका. मला मेसेज करा मी प्रत्येकाचे मेसेज वाचून रिप्लाय देईल. मी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. धनंजय मुंडे आणि ते वॉशिंग मशिनमधून क्लिन होऊन बाहेर येणार आहेत.', असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

Ranjit Kasale: 'मी लवकरच शरण येतोय, केलेले सर्व आरोप सिद्ध करून दाखवणारच'; रणजित कासलेंच्या नव्या व्हिडिओने खळबळ
Beed Police: मोठी बातमी! बीड पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासलेंनंतर आणखी २ पोलिस निलंबित, नेमकं कारण काय?

तसंच, 'याच्यामध्ये बळी जाणार तर तो माझाच जाणार आहे. माझ्याविरोधातच गुन्हे दाखल होणार आहे. आता तर एक दाखल झाला आणि आता आणखी दोन-चार होतील. त्यामुळे मी आता सामोरे जाणार आहे. आता मी बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे. त्यांनी मला पकडले तरी काही हरकत नाही. कारण ते माझे डिपार्टमेंट आहे मी डिपार्टमेंटचे मीठ खाल्ले आहे. हजर होऊन मी ही लढाई लढतच राहणार आहे. जे जे काही आरोप मी केले आहेत ते मी सिद्द करून दाखवणारच आहे.' , असे देखील रणजित कासले यांनी सांगितले.

Ranjit Kasale: 'मी लवकरच शरण येतोय, केलेले सर्व आरोप सिद्ध करून दाखवणारच'; रणजित कासलेंच्या नव्या व्हिडिओने खळबळ
Beed Crime : बायको भांडून पुण्याला गेली, नराधम बापाकडून ११ वर्षीय पोटच्या चिमुकलीवर अत्याचार; बीडमध्ये नेमकं चाललंय काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com