सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार?

Jay Pawar Rajya Sabha candidature news : बारामती पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. आता रिक्त झालेल्या जागेसाठी जय पवार, छगन भुजबळ यांच्यासह ६ नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
Sunetra pawar & Jay pawar
Sunetra pawar & Jay pawarsaam tv
Published On

Who will replace Sunetra Pawar in Rajya Sabha : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती पोटिनवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. या रिक्त जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण जाणार? याची चर्चा रंगली आहे. या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ६ नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये जय पवार आणि छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दिल्लीत कुणाला पाठवते? याकडे राज्याच्या नजरा खिळल्या आहेत. पार्थ पवार याआधीच दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. जय पवार राज्यातच थांबणार की केंद्रात जाणार? याकडेही कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यसभेसाठी कुणाच्या नावाची चर्चा?

छगन भुजबळ आणि जय पवार यांचे नाव राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी आघाडीवर आहे. त्याशिवाय आनंद परांजपे, अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांच्यासह अनेक नावांची चर्चा सुरू आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील या जागेसाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. आढळराव पाटील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यांचा शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) चे अमोल कोल्हे यांच्या विरोधात पराभव झाला होता. ते आता राज्यसभेसाठी प्रयत्न करत आहेत.

Sunetra pawar & Jay pawar
राजकारणात खळबळ! शिंदेंच्या शिवसेना नेत्याला अटक; साक्षीदाराचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार

छगन भुजबळ काय म्हणाले ?

सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांच्या राज्यसभेच्या जागी कोण जाणार? या चर्चांना जोर चढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी पक्षाच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नियमांनुसार आमदार झाल्यावर राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी आपला राजीनामा दिला. तुम्ही राज्यसभेवर जाणार का? यावर बोलताना ते म्हणाले की, यावर पक्षांतर्गत चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. स्वतःहून ती जागा मागणे अनुचित ठरेल. पण पक्षाने घेतलेला कोणताही निर्णय मी स्वीकारेन.

Sunetra pawar & Jay pawar
मोठी बातमी! कॅबिनेट मंत्र्यांच्या घरावर सकाळी ईडीची धाड, २० गाड्यामध्ये पोहचले अधिकारी अन्...

फक्त १८ महिन्यांचा कालावधी -

सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिलेल्या राज्यसभेच्या जागेचा कार्यकाळ दीड वर्ष शिल्लक आहे. बारामती लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर सुनेत्रा पवार जून २०२४ मध्ये राज्यसभेत दाखल झाल्या होत्या. आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. त्याजागी आता कुणाची वर्णी लागणार, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Sunetra pawar & Jay pawar
मोठी बातमी! तामिळनाडूच्या सत्तास्थापनेचा पेच कोर्टात पोहचला, नेमकी काय केली याचिका?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com