मोठी बातमी! कॅबिनेट मंत्र्यांच्या घरावर सकाळी ईडीची धाड, २० गाड्यामध्ये पोहचले अधिकारी अन्...

Sanjeev Arora ED Raid : पंजाबचे कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांच्या चंदीगडमधील निवासस्थानी ईडीने पहाटे छापा टाकल्याने पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. २० वाहनांमधून अधिकारी दाखल झाल्यानंतर आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
ED raid at Sanjeev Arora house
ED officials arrive at Punjab minister Sanjeev Arora’s Chandigarh residence during an early morning raid.
Published On

ED raid on Sanjeev Arora residence latest update : पंजाबमधील कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांच्या घरावर पहाटे ईडीने छापा टाकलाय. तब्बल २० वाहनांमधून ईडीचे अधिकारी सकाळी सकाळीच अरोरा यांच्या घरी दाखल झाले. चंदीगडमधील सेक्टर २ येथे संजीव अरोरा यांचे घर आहे, या ठिकाणी आज सकाळी साडेसात वाजता ईडीने अचानक छापा मारला. या घटनेनंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी यावर टीका केली आहे. सुडबुद्धीने ईडीकडून छापा टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

छापा मारताना ३ डझन सीआयए आणि एसएफ जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. या छापेमारीवर विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. आप खासदार संजय सिंह म्हणाले की, भाजपची सुपारी किलर असलेली ईडी आज पुन्हा पंजाबमध्ये दाखल झाली आहे. कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांच्या निवासस्थानी छापे सुरू झाले आहेत. हे नाटक दोन-तीन दिवस चालेल. खोट्या बातम्या पसरवल्या जातील आणि सुपारी किलर निघून जातील. त्यानंतर, त्यांचे बॉस त्यांना नवीन काम देतील.

ED raid at Sanjeev Arora house
Sambhajinagar Accident : हळदीला जाताना काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत इंजिनिअरिंग विद्यार्थिनीचा मृत्यू

ईडी चंदीगड आणि दिल्ली-एनसीआरमधील संजीव अरोरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चार ठिकाणांवर छापा मारला. यात मंत्री म्हणून संजीव अरोरा यांना वाटप केलेल्या त्यांच्या अधिकृत निवासस्थानाचा समावेश आहे. ईडीने दिल्ली, गुडगाव आणि चंदीगडमधील पाच ठिकाणांवर छापे टाकले, ज्यात हॅम्पटन स्काय रियल्टी लिमिटेडच्या कार्यालयाच्या जागेचा आणि संजीव अरोरा यांच्या घराचा समावेश आहे.

संजय सिंह यांनी 'एक्स'वर पोस्ट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींना पंजाबच्या भगवंत मान सरकारला बदनाम करायचे आहे का? पंजाबच्या लोकांची कामे थांबवायची आहेत का? त्यासाठी आणखी किती डावपेच वापरणार आहात? दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भगवंत मान यांनी केंद्रातील सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी एक्सवर पोस्ट करत ईडीच्या कारवाईला चुकीचे म्हटलेय.

ED raid at Sanjeev Arora house
राजकारणात खळबळ! शिंदेंच्या शिवसेना नेत्याला अटक; साक्षीदाराचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार

भगवंत मान म्हणाले की, भाजपच्या ईडीने आज पुन्हा एकदा संजीव अरोरा यांच्या घरी धाड टाकली. वर्षभरात भाजपच्या ईडीने त्यांच्या घरी भेट देण्याची ही तिसरी वेळ आहे. तरीही, त्यांना काहीही सापडले नाही. पंजाब ही गुरूंची भूमी आहे. औरंगजेबसुद्धा ती जिंकू शकला नाही. ही भगतसिंगांची भूमी आहे, जे ब्रिटिशांपुढे कधीही झुकले नाहीत. त्यामुळे, पंजाब मोदींच्या डावपेचांना कधीही बळी पडणार नाही. पंजाब ईडी आणि भाजप यांच्यातील ही अनैतिक युती संपुष्टात आणेल.

ED raid at Sanjeev Arora house
Thalapathy Vijay CM oath : राजकारणात नवा ट्विस्ट! थलापती विजय यांचा शपथविधी रखडला; 'मॅजिक फिगर'साठी अजून २ आमदारांच्या पाठिंब्याची गरज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com