सूशांत सावंत
Sudhir Mungantiwar News : कोरोना (Corona) काळात लॉकडाऊनमुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. त्यामुळे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. केवळ चित्रिकरणाच्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांना अनेक समस्यांना सामारे जावे लागलं. याच कलाकारांसाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली होती. या कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली.
एकल कलाकारांची निवड पद्धती व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबरोबर वार्षिक उत्पन्न रुपये मर्यादाही 48 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये कमाल इतकी मर्यादा करण्यात आली आहे. समूह लोकपथकांचे मालक /निर्माते यांनी एकरकमी विशेष अनुदान पॅकेज मिळविताना सादर करण्याच्या कागदपत्रे व निवड पद्धतीत बदल करण्यात आले असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
याशिवाय समूह लोकपथकांचे मालक/निर्माते यांनी एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेज मिळविताना सादर करावयाच्या कागदपत्रे आणि निवडपद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत परिपत्रक काढले असून सदर परिपत्रक www.maharashtra.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.