शिवाजी काळे -
Shivsena symbol Decision: शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे? या संदर्भात आज शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर (Election Commission) आपली कागदपत्रं सादर केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या वतीने वकील देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोगात कागदपत्र सादर केली तर शिंदे गटाच्या वतीने वकील उत्सव त्रिवेदी यांनी कागदपत्रं सादर केली.
ठाकरे गटाच्या वतीने आज पहिल्यांदाच १८० राष्ट्रीय कार्यकारणीच्या प्रतिनिधींची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. तर शिंदे गटाने ७ लाख पक्षाच्या प्राथमिक सदस्यांची नाव निवडणूक आयोगाला सादर केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ -
दोन्ही गटाने सादर केलेल्या कागदपत्रांनतर निवडणूक आयोगाने आज ठाकरे गटाला उद्या दुपारी २ वाजेपर्यत विहित नमुन्यात कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर कागदपत्र अगोदरच सादर केली आहेत.
आत्तापर्यंत शिंदे गटाने सादर सादर केलेले पुरावे -
विधानसभा आमदार 40, लोकसभा खासदार 12, शिवसेना प्राथमिक सदस्य 1,66,764, शिवसेना पदाधिकारी 144, शिवसेना राज्यप्रमुख 11 असं कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र, आत्तापर्यंत ठाकरे गटाने या पैकी काहीही पुरावा सादर केलेलं नाहीत.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने प्रतिनिधी सभेचा 18 जुलै रोजी ठराव दिला आहे. तर ठाकरे गटाकडून प्रतिनिधी सभेचा कोणताही ठराव पास करण्यात आलेला नाही. तर राष्ट्रीय कार्यकारणीचा ठराव शिंदे गटाने कागदपत्रांसोबत जोडलेला नाही. तर उद्धव ठाकरे गटाकडून राष्ट्रीय कार्यकारणीचा कोणताही ठराव कागदपत्रांसोबत दिलेला नाही.
एकंदरीत पाहाता ठाकरे गटाने आत्तापर्यंत 180 राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्या व्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्र सादर केलेली नाहीत. त्यामुळे उद्या दुपारपर्यंत ठाकरे गटाला आपली कागदपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करायची आहेत. त्यामुळं उद्या ठाकरे गट कोणती कागदपत्र सादर करणार आणि त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.