Shivsena : 'उद्धव ठाकरेंसाठी एक जागा राखीव ठेवा'; शिंदे गटाचं थेट मेंटल हॉस्पिटलला पत्र

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना एक जागा राखीव ठेवण्यासाठी थेट मनोरुग्णालयाला पत्र लिहिलं आहे.
uddhav thackeray
uddhav thackeray saam tv
Published On

Maharashtra Political News : दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर चौफेर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) टीकेनंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना एक जागा राखीव ठेवण्यासाठी थेट मनोरुग्णालयाला पत्र लिहिलं आहे. शिंदे गटाच्या पत्रानंतर दोन्ही गटाचा वाद आणखी चिखळण्याची शक्यता आहे.

uddhav thackeray
शिंदे सरकार सत्तेवर येताच रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा; 'फोन टॅपिंग' प्रकरणात मिळाली क्लिन चीट?

उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरून दसरा मेळाव्याला शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवावर देखील वक्तव्य केलं. त्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयाला थेट पत्र लिहिलं आहे. पत्र लिहित मनोरुग्णालयात एक जागा राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.

पुण्यताली शिंदे गटाचे कार्यरर्ते अजय भोसले यांनी हे पत्र लिहिले आहेत. भोसले यांनी येरवडा मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक यांना पत्र दिलं आहे. या पत्रात तरी आपल्या रुग्णालयात मा. उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक जागा राखीव ठेवण्याची विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.

uddhav thackeray
बीकेसीतील दसरा मेळाव्यामुळे शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

'उद्धव ठाकरे यांनी टीका करताना एकनाथ शिंद यांच्या दीड वर्षांच्या नातवापर्यंत मजल गेली. ज्या बालकाना धड आपले बोल बोलता येत नाहीत. दुइदुइ रांगणारे ते बाळ त्याचा राजकारणाशी काय संबंध ? या वयात ते बाळ नगरसेवकाचे तिकीट मागणार आहे का ?, असा सवाल शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने पत्रातून केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com