Lonavala Pune Local Train : 'या' वेळेत लाेणावळा - पुणे लाेकल सुरु करा; रेल्वे प्रवासी संघाची मागणी

या मागणीचा विचार झाला पाहिजे असे विविध शाळेतील शिक्षक, पालकांचं देखील मत आहे.
lonavala pune local train, students,
lonavala pune local train, students, saam tv

Lonavala Pune Local Train : लोणावळा ते पुणे लोहमार्गावर दुपारी पाऊण ते एक वाजण्याच्या दरम्यान लोणावळा ते पुणे अशी लोकल (local train) सुरु करा अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे केली आहे. या मागणीचा विचार झाला पाहिजे असे विविध शाळेतील शिक्षक, पालकांचं देखील मत आहे.

लोणावळा शहरातील सकाळच्या शाळा दुपारी 12:15 वाजता सुटतात. लोणावळा परिसरात जवळपास 13 ते 14 प्राथमिक शाळा (schools), विद्यालये, महाविद्यालये आहेत. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी हे लोकलने प्रवास करत असतात. सर्व विद्यार्थी मळवली, कामशेत कान्हे, वडगांव, तळेगांव, देहुरोड, आकुर्डीसह मावळ (maval) तालुक्यातील दुर्गम भागातून शिक्षणासाठी येत असतात.

lonavala pune local train, students,
Mumbai Goa Highway : 'या' तारेखपर्यंत मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; जाणून घ्या नवा आदेश

काही शिक्षक देखील देहूरोड, कासारवाडी तसेच पुण्याहून शाळेत येतात.या सर्वांना सकाळी लोकल उपलब्ध आहे मात्र काही शाळा दुपारी सुटल्यानंतर पुण्याकडे जाणारी लोकल थेट 02:50 ला आहे. जवळपास 2 तास 45 मिनिटं या विद्यार्थांना रेल्वे स्थानकावर बसून रहावे लागते.

lonavala pune local train, students,
Maharashtra Monsoon Session: विधान भवन परिसरात आमदारांचा राडा; सत्ताधारी- विरोधकांमध्ये धक्काबुक्की

मुलांच्या अभ्यासातील हा वेळ वाया जातो. यामुळे प्रवासाला कंटाळून मुलांचे शाळेतील गैरहजेरीचे प्रमाणही वाढत आहे. शालेय विद्यार्थ्यांची होणारी ही गैरसोय दूर करण्यासाठी या मागणीचा सकारात्मक विचार करत लोणावळा स्थानकावरून पुण्याकडे जाण्यासाठी लोकल सुरु करावी अशी मागणी पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघटना यांनी रेल्वे प्रशासनास केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

lonavala pune local train, students,
England Tour : धोनीच्या 'त्या' षटकारनं माझं आयुष्यच बदललं, इंडियाचं स्वप्न पुर्ण करणार : किरण नवगिरे
lonavala pune local train, students,
Ganesh Utsav 2022 : रस्त्यांवर खड्डे खाेदल्यास गुन्हा दाखल करु; गणेशाेत्सव मंडळांना प्रशासनाचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com