चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आलीय. या कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके तोडले आहेत. पाच-सहा कुत्र्यांनी चिमुकल्यावर हल्ला केलाय. अंगावर काटा आणणारा कुत्र्यांच्या टोळीच्या हल्ल्याचा थरार व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय. चाकण जवळील कडाचीवाडी येथे लोकवस्तीत भटक्या कुत्र्याच्या टोळक्यांनी थेट चिमुकल्या मुलावर प्राणघातक हल्ला केला.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झालाय. कडाचीवाडी येथे यश पार्क रोडवर चिमुकला रस्त्यावर खेळत होता. तेव्हा अचानक काही कुत्र्यांच्या टोळक्याने चिमुकल्या मुलावर हल्ला (Pune News) केला. या हल्ल्यात चिमुकल्याला खाली पाडुन कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले. यावेळी नातेवाईकांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे चिमुकल्याचा जीव थोडक्यात बचावला आहे. चिमुकल्याचा चारही बाजूंनी कुत्र्यांनी घेरलं होतं. जवळपास ६ ते ७ कुत्र्यांनी त्याला खाली पाडलं अन् लचके तोडले.
हा हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना आता भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनीही हैदोस (stray Dogs Attack On small child) घातलाय. कचरा कुंड्यांवर मांसाहार करणारी ही कुत्र्यांची टोळी चिमुकल्या मुलांवर थेट हल्ला करत आहे. त्यामुळे ही चिंत्तेची बाब असुन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे. भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केल्यामुळे परिसरात आता दहशतीचं वातावरण आहे. ७ कुत्र्यांनी मिळून चिमुकल्यावर हल्ला (Stray Dogs Attack) केलाय.
या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवरून हटवणं बेकायदेशीर आहे. तसेच कुत्र्यांना परिसरामधून देखील पळवून लावता येत नाही. त्यामुळे कुत्रा रस्त्यावर (Dogs Attack) आल्यानंतर त्याला दत्तक घेईपर्यंत तिथे राहण्याचा अधिकार आहे. भारतामध्ये २००१ पासून कुत्र्यांना मारण्यावर देखील बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे होत आहे. परिसरामध्ये मात्र घडलेल्या प्रकारामुळे भीतीचं वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.