Dog Attack In Bengaluru: मॉर्निंग वॉकला निघालेल्या वृद्ध महिलेवर १२ कुत्र्यांचा हल्ला; रूग्णालयात नेताना मृत्यू

Dog Attack In Bengaluru: बंगळुरूमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका 76 वर्षीय वृद्ध महिलेवर १० ते १२ कुत्र्यांनी हल्ला केला. ही महिला कुत्र्यांच्या हल्लात इतकी गंभीर जखमी झाली की तिचा मृत्यू झाला.
Dog Attack In Bengaluru
Dog Attack In BengaluruGoogle
Published On

भटक्या कुत्र्यांची दहशत अजून थांबायचं नाव घेत नाहीये. कर्नाटकाची राजधानी बंगळूरूमध्ये रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी एका वयोवृद्ध महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली. बुधवारी, बंगळुरूमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका 76 वर्षीय वृद्ध महिलेवर १-० ते १२ कुत्र्यांनी हल्ला करून तिला ठार केलं . मृत महिला ही भारतीय हवाई दलाच्या जवानाची सासू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.

१०-१२ कुत्र्यांचा हल्ला

पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, ७६ वर्षीय राजदुलारी सिन्हा नावाच्या वृद्ध महिला बंगळुरूमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. यावेळी सकाळी 6.30 च्या सुमारास हवाई दल पूर्व 7 व्या निवासी कॅम्पमधील एका मैदानात तब्बल 10 ते 12 कुत्र्यांनी या महिलेवर अचानक हल्ला केला. ही महिला कुत्र्यांच्या हल्लात इतकी गंभीर जखमी झाली की तिचा मृत्यू झाला.

Dog Attack In Bengaluru
Patna House Collapse : सत्संगासाठी आलेल्या भाविकांवर भलं मोठं घर कोसळलं; १०० हून अधिक जखमी, पाटण्यातील भीषण घटना

या हल्ल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, महिलेच्या मृत्यूबाबत गंगाम्मा गुडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितली पूर्ण कहाणी

सोशल मीडियावर X वर एका व्यक्तीने या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. हा व्यक्ती या घटनेचा प्रत्यक्षदर्शी होता. तो म्हणाला की, आज सकाळी त्याने जे पाहिले ते फार दुःखद होतं. हवाई दलाच्या मैदानामध्ये तब्बल १२ कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केला. मी त्या महिलेची कोणत्याही प्रकारे मदत करू शकलो नाही.

त्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार, त्या ठिकाणची भिंत उंच असल्याने मी त्या वृद्ध महिलेला वाचवू शकलो, नाही. त्यानंतर काही लोकांना बोलावण्यात आलं ज्यांनी महिलेला रुग्णालयात नेले. मात्र, महिलेचा जीव वाचू शकला नाही.

Dog Attack In Bengaluru
Shanshan Typhoon : २५० किमी वेगानं सरकतंय महाभयंकर चक्रीवादळ; जपान हायअलर्टवर, ८ लाख नागरिकांना स्थलांतरित करणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com