Patna House Collapse : सत्संगासाठी आलेल्या भाविकांवर भलं मोठं घर कोसळलं; १०० हून अधिक जखमी, पाटण्यातील भीषण घटना

Patna House Collapse News : सत्संगासाठी आलेल्या भाविकांवर भलं मोठं घर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत १०० हून अधिक जखमी झाले आहेत. पाटण्यातील श्रीपालपूरमध्ये ही घटना घडली आहे.
सत्संगासाठी आलेल्या भाविकांवर भलं मोठं घर कोसळलं; १०० हून अधिक जखमी, पाटण्यातील भयंकर घटना
Patna House Collapse Saam tv
Published On

पाटणा : बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील श्रीपालपूर गावात भीषण दुर्घटना घडली आहे. या गावात सत्संगासाठी आलेल्या १०० हून अधिक जणांवर जुनं घर कोसळल्याची घटना घडली आहे. या घरात लोक सत्संगासाठी बसले होते. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या श्रीपालपूरमधील कॉलेजचे माजी प्राचार्य रामदयालु सिंह यांचा जुनं घर होतं. या घरात सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सत्संगासाठी कार्यक्रमात ५० ते ६० महिलाांनी हजेरी लावली होती. हेच जुनं घर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ८० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक लोकांकडून जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

सत्संगासाठी आलेल्या भाविकांवर भलं मोठं घर कोसळलं; १०० हून अधिक जखमी, पाटण्यातील भयंकर घटना
Gujarat Bhuj Women Heart Attack : देशभक्ती गीत सादर करताना महिला कोसळली, १५ ऑगस्टला भर कार्यक्रमात हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू, पाहा Video
सत्संगासाठी आलेल्या भाविकांवर भलं मोठं घर कोसळलं; १०० हून अधिक जखमी, पाटण्यातील भयंकर घटना
Bihar News: भावाच्या मृ्त्यूनंतर विधवा वहिनीसोबत लग्न केलं; कुटुंबीयांनी दिली भयंकर शिक्षा

घर कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. त्यातील २० ते २५ जणांची प्रकृती नाजूक अससल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत जखमी महिलांची संख्या मोठी आहे.

५ डझनहून अधिक महिला जखमी

या सत्संगासाठी बहुतेक महिलांनी हजेरी लावली होती. या दुर्घटनेत ५ डझनहून अधिक महिला जखमी झाल्या आहेत. तर जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

घटना नेमकी कशी घडली?

पाटण्याच्या पूनपून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीपालपूर गावातील एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान जोरदार पावसामुळे घराची जुनी भिंत कोसळली. या घटनेत भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले. या कार्यक्रमाला महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या कार्यक्रमाला २५० हून अधिक जणांनी हजेरी लावली होती.

ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. लोक बचावासाठी सैरावैरा धावू लागले. या दुर्घटनेनंतर स्थानिक लोकांनी तातडीने रुग्णवाहिका घेऊन आले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com