Shanshan Typhoon : २५० किमी वेगानं सरकतंय महाभयंकर चक्रीवादळ; जपान हायअलर्टवर, ८ लाख नागरिकांना स्थलांतरित करणार

Shanshan Typhoon in Japan : जपानमध्ये महाभयंकर चक्रीवादळ धडकणार आहे. २५० किलोमीटर प्रतितास वेगाने चक्रीवादळ पुढे सरकत आहे. त्यामुळं कागोशिमा आणि मियाझाकी प्रांतांसाठी हवामान विभागानं अलर्ट दिला आहे.
Japan Shanshan Typhoon alert
Japan Shanshan Typhoon alertSocial Media
Published On

जपानला शानशान चक्रीवादळाचा (Shanshan Typhoon) तडाखा बसण्याची शक्यता आहे. २५० किलोमीटर प्रतितास वेगानं हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. त्यामुळं हवामान विभागानं अलर्ट जारी केला आहे. कागोशिमा आणि मियाझाकी प्रांतांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महाभयंकर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने जपान सरकारही सतर्क झालं आहे. सरकारने थेट आदेश जारी केला असून, शुक्रवारपर्यंत जवळपास २१९ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. एका प्रसिद्ध कार कंपनीने कारखाने बंद केले आहेत. जपान सरकारने दोन प्रांतांमधील साधारण आठ लाख नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेशात म्हटले आहे.

Japan Shanshan Typhoon alert
Yavatmal Cyclone News | यवतमाळमध्ये चक्रीवादळ, टीनपत्रा उडून तीन जण जखमी, एकाचा कापला हात

विशेष म्हणजे, राजधानी टोकियोपर्यंत रेल्वे, बुलेट ट्रेन, विमानांची उड्डाणे आणि टपाल सेवा बंद करण्याचे सरकारने आदेशात म्हटले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, जेएमएच्या अंदाजाप्रमाणे, शानशान चक्रीवादळ स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता याकुशिमा बेटावरून ७० किलोमीटर दूरवर होते. क्युशू बेटावर कागोशिमा आणि मियाझाकी प्रांताच्या दिशेने वेगाने सरकत आहे. शानशान वादळ हे प्रचंड वेगाने दक्षिणेकडील क्युशूच्या दिशेने सरकणार असल्याचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

चक्रीवादळाचा वेग ताशी २५० किलोमीटर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या चक्रीवादळांपैकी हे महाभयंकर असेल, अशी भीती हयाशी यांनी व्यक्त केली आहे. शानशान चक्रीवादळाआधी या महिन्याच्या सुरुवातीला एम्पिल चक्रीवादळ धडकलं होतं. किनारी भागात या चक्रीवादळानं जोरदार तडाखा दिला होता. अनेक शहरांमध्ये ब्लॅकआऊटसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शेकडो विमानांची उड्डाणे रद्द झाली होती. तसेच रेल्वेसेवाही विस्कळीत झाली होती.

८ लाखाहून अधिक नागरिकांच्या स्थलांतरणाच्या सूचना

जेएमएच्या म्हणण्यानुसार, शानशान चक्रीवादळ पुढील काही दिवसांत क्युशूच्या जवळच्या किनारी भागांना धडकण्याची शक्यता आहे. काही दिवसांत ते टोकियोसह मध्य आणि पूर्वेकडील भागांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी आदेश जारी करून, कागोशिमा आणि शिजुओका प्रांतातील आठ लाखांहून अधिक नागरिकांच्या स्थलांतरणाचे आदेश दिले आहेत.

Japan Shanshan Typhoon alert
Cyclone Remal : रेमल चक्रीवादळ बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकलं; बंगालमध्ये जोरदार वारा अन् तुफान पाऊस, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com