Uday Samant News: आदित्य ठाकरेंच्या दाओस दौऱ्यावर किती झाला होता खर्च? उदय सामंतांनी थेट आकडेवारीच वाचून दाखवली

Uday Samant: लंडन दौऱ्यावरून मुंबईत परत आल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंतांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर टीका केलीय.
Uday Samant
Uday SamantSaam
Published On: 

Uday Samant on Aditya Thackeray:

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे लंडन दौऱ्यावरून मुंबईत परत आल्यानंतर अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी सारथी कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लंडन दौऱ्यातील कोणकोणते करार करण्यात आले याविषयी माध्यमांना माहिती दिली. देशातली पहिली AI पॉलिसी घेण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतलाय. AI पार्क आणि क्लस्टर करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचं उद्योगमत्री सामंत म्हणाले. याशिवाय मागील सरकारच्या काळात मंत्र्यांनी एमआयडीसीच्या खर्चातूनच दौरे केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.(Latest News)

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत लंडन दौऱ्यावरुन मुंबईत परतले आहेत. मुंबईत आल्यानंतर अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी सारथ कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर घाणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी विदेश दौऱ्याचा खर्च विचारणाऱ्या आदित्य ठाकरें यांच्या दाओस दौऱ्याच्या लेखाजोखा मांडत त्यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरेंनी त्यांच्या डाओस दौऱ्यात मोठा पैसा खर्च केला. सामंत यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण खर्च वाचून दाखवला.

असा आहे दाओसचा खर्च

विमान खर्च - ४४,६३,०६२.६

वाहन व्यवस्था - ६७,१९,७६८

निवास व्यवस्था - २,४०,१५,०७९

चहापान आणि भोजन - १,०५,५०,६९२

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, " वाघनखं भारतात आणण्यासाठी करार करण्यात आला. मी मागे देखील लंडन दौऱ्यावर असताना अनेकांनी राजकारण केलं. मुख्यमंत्री यांचा दौरा २६ तारखेला ट्विट केल्यानंतर रद्द झाला असे काहींनी म्हटलं. २५ तारखेला भूषण गगराणी यांनी कळवलं होतं, यांचे ट्विट २६ तारखेला झाले. काही लोकांना माहीत नव्हते मी लंडनला जात होतो तर कुणाच्या खर्चाने जात होतो. मी उद्योगमंत्री म्हणून स्वतःच्या खर्चाने गेलो आणि १३ मिटिंग घेतल्या."

असं म्हणत सामंतांनी आदित्य ठाकरेंचा २०२२ च्या दौऱ्यावर झालेला खर्च सांगितला. तसेच नितीन राऊत आणि ओएसडीच्या दौऱ्यावर झालेला खर्च कुणी केला यांचं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलेलं नाही. पण त्याचे पेपर माझ्याकडे आहे. स्वतः सरकारी पैशातून जायचं आणि दुसऱ्याच्या दौऱ्यावर बोलायचं असं सुरू आहे. तेव्हा उद्योग विभागाच्या दौऱ्यावर ऊर्जा मंत्री, पर्यटन मंत्री का गेले होते? आपण काय केलं हे लोकांना सांगायचे नाही." असा टोला सामंतांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

काही लोकांना सायबर युनिव्हर्सिटी तयार करण्यासाठी जागा हवी. काही लोक म्हणतात आम्ही खोके घेतले. मग अजितदादा देखील खोके घेऊन आलेत का? हे त्यांनी जाहीर करावे, असं सामंत म्हणाले. एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचे काम काही लोक करत आहेत. कोरोना काळात यांनी मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम केले, ते आज मुख्यमंत्र्यांवर बोलत आहेत, असा टोला सामंतांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.