मावळ : जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरील (pune mumbai highway) सोमाटणे फाटा (Somatane Phata) येथील टोल नाक्यावर (toll plaza) बेकायदेशीरपणे टोल (toll) वसुली केली जाते. केंद्र आणि राज्य शासनाची टोल वसुली कधीच संपली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितल्या प्रमाणे ६० किलोमीटरच्या आत संबंधित टोलनाका येतो. त्यामुळं हा टोलनाका बंद करायला हवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी केली आहे. (toll plaza latest marathi news)
सोमाटने येथे जनसेवा विकास समितीने आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत वेलणकर बोलत होते. जनसेवा विकास समितीने देखील टोल नाका बंद व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले होते. दरम्यान, गडकरींचा ते जाहीर सत्कार करू इच्छित आहेत असेही म्हणाले.
दरम्यान टोल नाका बंद न झाल्यास आगामी काळात आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवली जाईल असा इशारा समितीने दिला. यावेळी जनविकास विकास समितीचे किशोर आवारेंसह कार्यकर्ते उपस्थित हाेते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.