जालना : राष्ट्रवादींच्या तक्रारींचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना देणार असल्याची माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे (mp shrirang barne) यांनी दिली. खासदार बारणे हे गेल्या तीन दिवसांपासून जालन्यात (jalna) असून आज (गुरुवार) त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काॅंग्रेसवर (ncp) निशाणा साधला आहे. (shrirang barne latest marathi news)
बारणे म्हणाले महाराष्ट्रात (maharashtra) सगळीकडे राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून शिवसेनेच्या (shivsena) पदाधिका-यांची कामे होत नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांकडून केल्या जात आहेत. मराठवाड्यातील बीड (beed) आणि जालन्यातही (jalna) हीच काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळं या तक्रारींचा अहवाल पक्षप्रमुखांकडे सादर करणार असून जो काय निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख घेतील.
दरम्यान मावळच्या लाेकसभेच्या जागे बाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आग्रह केला जात आहे या प्रश्नावर खासदार बारणे म्हणाले ही कल्पना कुणाच्या डोक्यातून आली याचा शोध घेतला पाहिजे असं म्हणत त्याला फारसे महत्व देत नसल्याचं स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.