सिद्धिविनायक मंदिरातील चोर कोण? सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंचे खळबळजनक आरोप

Raj Thackeray Alleges Massive Donation Scam at Siddhivinayak Temple: राममंदिरानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरीवरून नवा वाद उफाळून आलाय... सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी तब्बल 18 कोटींची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय आहे? कोणी हा आरोप केलाय ? पाहूयात या रिपोर्टमधून....
SIDDHIVINAYAK TEMPLE ₹18 CRORE THEFT ALLEGATION | RAJ THACKERAY SHOCKING CLAIM
SIDDHIVINAYAK TEMPLE ₹18 CRORE THEFT ALLEGATION | RAJ THACKERAY SHOCKING CLAIMsaam tv
Published On

अयोध्येतील राम मंदिरातल्या दानचोरीचा मुद्दा पेटलेला असताना आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील कोट्यवधींच्या चोरीवरून वाद पेटलाय़. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राच्या आधारे सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी होत असल्याचा खळबळजनक दावा केलाय...

विशेष म्हणजे राज ठाकरेंनी हा आरोप करताना सिद्धिविनायक न्यासाच्या विश्वस्त मंडळानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेल्या पत्राचा आधार घेतलाय.. त्या पत्रात विश्वस्त मंडळानं काय लिहलयं...पाहा...सिद्धिविनायक मंदिराची मिळकत 35 टक्के वाढवण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत. विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिराच्या दानपेटीतील पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेले आहेत. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिराच्या दानपेटीतील रकमेची मोजदाद 50 लाखांच्या आत होती. मात्र कर्मचारी पकडल्यानंतर गेल्या तीन आठवड्यात दानपेटीतील रक्कम दीड कोटी रुपयाच्या आसपास पोहचली आहे. त्यामुळे दानपेटीतील रक्कम काही कर्मचारी लंपास करत होते. याचाच अर्थ, दरवर्षी 18 कोटी रुपयांची रक्कम चोरली जात होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केलीय.

दुसरीकडे सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकरांनी ही चोरी झाल्याचं मान्य करत...चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचा आणि त्यानंतर मंदिरातील उत्पन्न वाढल्याचा दावा केलाय..याआधी उपमुख्यमंत्री शिंदेंनी सिद्धीविनायक मंदिरातील अपहाराचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेसेनेवर निशाणा साधला होता...त्यात तत्कालीन अध्यक्ष आदेश बांदेकर आणि तत्कालीन कार्यकारी सदस्यांविरोधात शिंदेंनी आक्रमक पवित्रा घेतला होता...त्यात आता विश्वस्त मंडळातील सदस्यांनीच शिंदेंना पत्र लिहून वरिष्ठ पातळीवर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्यानं एकच खळबळ माजलीय...

एकीकडे राम मंदिरातील दानचोरीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत असताना सिद्धविनायक मंदिरात कुणाच्या आशीर्वादानं कोट्यवधींवर डल्ला मारला गेला? याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई होणार का? हाच खरा सवाल आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com