दरवाजाला लटकून, दोन डब्यांच्या मध्ये उभं राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अनेक व्हिडिओ यापूर्वी आपण बघितले असावेत. आता अशीच एक घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली आहे. एसी लोकलच्या टपावर एक तरूण चढला. ही एसी लोकल बदलापूरवरून कल्याणच्या दिशेने येत होती.
या लोकलच्या टपावर तो तरुण बसला होता. कल्याण रेल्वे स्थानकात ही लोकल आली. त्यावेळी स्थानकावरील प्रवाशांनी हे दृश्य बघितले. याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली. बराच वेळ शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर या तरुणाला रेल्वे पोलिसांनी टपावरून खाली उतरवले. आता ही व्यक्ती नेमकी कोण आहे, लोकलच्या टपावर का चढली, याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत.
बदलापूरहून दादरकडे जाणाऱ्या एसी लोकल ट्रेनच्या टपावर चढून एका तरुणाने थरारक प्रवास केल्याची धक्कादायक घटना आज, मंगळवारी दुपारी घडली. या प्रकारामुळे कल्याण रेल्वे स्थानकात मोठा गोंधळ उडाला. रेल्वे वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला.
दुपारी साधारण दोनच्या सुमारास विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान एसी लोकलच्या छतावर एक तरुण चढल्याचे आढळून आले. हा तरुण मनोरुग्ण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे डब्यातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. विठ्ठलवाडी स्थानकावर रेल्वे पोलिसांनी त्या तरुणाला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणत्याही परिस्थितीत खाली येण्यास तयार नव्हता. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता संबंधित लोकल पुढे कल्याण स्थानकाकडे रवाना करण्यात आली.
कल्याण रेल्वे स्थानकावर ट्रेन पोहोचताच रेल्वे पोलीस, कर्मचाऱ्यांसह दोन ते तीन हमालांच्या मदतीने त्या तरुणाला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर २.५० वाजता शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले. संबंधित तरुणाला तात्काळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे अर्धा ते पाऊण तास प्रवाशांचा खोळंबा झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.