Mumbai : “तुझा रेट काय?” बस स्टॉपजवळ उभ्या असलेल्या मुलीशी असभ्य वर्तन, शिवसैनिकांनी दिला चोप; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Mira Bhayander News : मुंबईच्या भाईंदरच्या मीरा गावठाण परिसरात बस स्टॉपवर तरुणीची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीचा अश्लील प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
MIRA ROAD HARASSMENT CASE: WOMAN MOLESTED AT BUS STOP, CCTV VIDEO GOES VIRAL
MIRA ROAD HARASSMENT CASE: WOMAN MOLESTED AT BUS STOP, CCTV VIDEO GOES VIRALSaam Tv
Published On
Summary
  • मीरा गावठाण बस स्टॉपवर तरुणीची छेडछाड झाल्याचा आरोप

  • आरोपीचा अश्लील प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला

  • संतप्त नागरिक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आरोपीला जाब विचारला

  • महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे

मनोज तांबे, मुंबई

भाईंदरच्या मीरा गावठाण परिसरात बस स्टॉपवर घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका तरुणाने तरुणीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून, हा संपूर्ण प्रकार जवळील हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण बस स्टॉपजवळ उभ्या असलेल्या तरुणीच्या दिशेने अश्लील हावभाव करत होता. त्याने तरुणीकडे लज्जास्पद शब्दांत “तुझा रेट काय?” अशी विचारणा केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे तरुणी प्रचंड घाबरली आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने तत्काळ जवळील हॉटेलमध्ये धाव घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

MIRA ROAD HARASSMENT CASE: WOMAN MOLESTED AT BUS STOP, CCTV VIDEO GOES VIRAL
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

घटनेची माहिती मिळताच शिवसेना शाखाप्रमुख अजय साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित तरुणाला जाब विचारत संताप व्यक्त केला. उपस्थित नागरिकांच्या समोरच त्यांनी त्या तरुणाला चांगलाच चोप दिला तसेच त्याला उठाबशा काढण्यास भाग पाडले. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.

MIRA ROAD HARASSMENT CASE: WOMAN MOLESTED AT BUS STOP, CCTV VIDEO GOES VIRAL
Shocking : कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं भयंकर कांड, हॉटेलमध्ये विद्यार्थिनीवर केला बलात्कार; आता २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

अनेकांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनीही परिसरातील बस स्टॉप व सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मीरा भाईंदर शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com