मुंबई : दसरा मेळाव्याआधी (Dasara Melava) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांपैकी आणखी आमदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. तीनपेक्षा जास्त आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे गटाने याआधी बंडखोरी करत राज्यात सत्तांतर घडवून आणलं आहे. शिंदे गट आपणच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे दसरा मेळावा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मोठं व्यासपीठ ठरणार आहे. मात्र त्याआधीच एकनाथ शिंदे आणखी काही आमदार आपल्यासोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. (Latest News)
शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर खिंडार पडलेल्या शिवसेनेला सावरण्याचं काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर नेते करत आहे. त्यात दसरा मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र आणखी तीन आमदार शिंदे गटासोबत गेल्यास आगामी निवडणुकीत याचा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे.
तीन आमदार कोण आहेत?
आता हे तीन आमदार कोण असतील याचे विविध अंदाज बांधले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील दोन आमदार आणि एक मुंबईतील आमदार शिंदे गटात सामील होऊ शकतो. मुंबईतील आणखी एक आमदार शिंदे गटात सामील झाल्यास मुंबई महापालिका निवडणुकीआधी हा उद्धव ठाकरे मोठा धक्का असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.