Uddhav Thackeray : गद्दारांना धडा शिकवायला हवा; दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरे गरजले

फक्त हातात भगवा नको तर, हृदयात भगवा हवा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray On dasara melava shivsena
Uddhav Thackeray On dasara melava shivsenaSaam tv news
Published On

मुंबई : दसरा मेळाव्याआधीच (Dasara Melava) राज्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटातील नेते एकामेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटलं की, लोकशाही जपणं आपलं कर्तव्य आहे. मात्र गद्दारांना धडा शिकवला पाहिजे. फक्त हातात भगवा नको,तर हृदयात भगवा हवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray On dasara melava shivsena
Dasara Melava : आम्ही विचारांचे वारसदार! शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचं पोस्टर्स रिलीज

दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवात साधत आहेत. माझ्यासोबत जुनी माणस आहेत, त्यात नवी माणसं जोडली जात आहेत. शिरूरमधील काही माणसं गेली पण, खरी माणस माझ्यासोबत `आढळ´ आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंना आढळराव पाटलांना लगावला आहे. या मतदारसंघात शिवनेरी आहे. त्या मतदारसंघात गद्दार माणसे आढळली नाही पाहिजेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

Uddhav Thackeray On dasara melava shivsena
Video : आरएसएसवर बंदी हवी ? सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला असं वाटतं...

खरं, हिंदुत्व वाढवण्याची देवाने आपल्याला एक संधी दिली आहे. मध्यंतरी, हिंदुत्वाचा तोतयागिरी करणाऱ्यांनी कळस गाठला. इतिहासात हे तोतयांचे बंड म्हणून ओळखले जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात वाद सुरू होता. यानंतर मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर म्हणजे शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेण्यास गेल्या आठवड्यात परवानगी दिली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा होणार आहे.

एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. यापार्श्वभूमीवर हे पोस्टर्स रिलीज करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजीपार्क मैदान दिले आहे. यासाठी 20 हजार रुपये शुल्क आणि काही डिपॉझिट भरण्यात सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com