भाजपचे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री गोळीबार केला. हिललाईन पोलीस ठाण्यातच हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनं संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर शिवसेना ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षांमध्ये माफिया आणि गुंडांचे राज्य सुरू आहे. निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांना जामीनावर बाहेर काढलं जात आहे", असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत बोलत होते.(Latest Marathi News)
"महेश गायकवाड कोण आहे, हे मला माहिती नाही. पण त्यांच्यावर आमदारानेच गोळीबार केला, हा प्रकार धक्कादायक आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री कुठे आहे. ते आम्हाला कायदा शिकवतात. अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन, हे प्रकरण फक्त गृहमंत्र्यांसोबत चर्चा करण्यापुरतंच मर्यादीत नाही", अशी टीकाही राऊतांनी केली.
"आज महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ पोलिसांच्या कॅबिनमध्ये गोळीबार होतो. देवेंद्र फडणवीस आपण वकील आहात, ज्ञानी आहात. राम तुमच्या बाजूने आहे, तुमचं राज्य कायद्याचं आहे का? ज्या आमदाराने गोळीबार केला आहे त्याला जामीन मिळेल", असा घणाघातही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
"भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांचं निवेदन सामान्य जनतेने समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी गोळीबार केला, असं ते म्हणत आहेत. कारण मुख्यमंत्रीच गुन्हेगारांना पाठिशी घालत आहेत आणि मदत करत आहेत", असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.