Buldhana Fire News: चिखलीतील जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; कापसाच्या अनेक गठाणी जळून खाक

Chikhali Factory Fire: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली एमआयडीसी परिसरात असलेल्या जय गुरू गणेश जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला शुक्रवारी (२ फेब्रुवारी) अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
Chikhali Ginning Pressing Factory Fire
Chikhali Ginning Pressing Factory FireSaam TV
Published On

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

Buldhana Chikhali Ginning Pressing Factory Fire

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली एमआयडीसी परिसरात असलेल्या जय गुरू गणेश जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला शुक्रवारी (२ फेब्रुवारी) अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. आग लागल्याचं कळताच फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांच्या कापूस गठाणी जळून खाक झाल्या आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chikhali Ginning Pressing Factory Fire
Mahesh Gaikwad News: महेश गायकवाड यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

त्यामुळे फॅक्टरीमालकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, चिखली येथील अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी प्राथामिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. (Latest Marathi News)

चिखली 'एमआयडीसी' परिसरात प्लॉट क्रमांक बी - ३ मध्ये अभय जैन यांच्या मालकीचे जय गुरू गणेश जिनिंग आहे. शुक्रवारी या प्रेस हाऊसमध्ये कापसाचे गठाणी बनविण्याचे कार्य सुरू होते. या ठिकाणी असलेल्या 'ऑनलाइन बेल्ट' वर अचानक 'शॉर्ट-सर्किट' झाले.

त्यामुळे प्रेस हाऊसमधील जय गुरू गणेश जिनिंग व रोकडोबा जिनिंग मधील कापूस व सरकीला आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. तेथील कामगारांनी तातडीने काही गठाणी बाजूला करत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

मात्र आगीचा भडका उडाल्याने आग आटोक्यात आली नाही. आगीची माहिती मिळताच चिखली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत जवळपास ५ लाखांचा कापूस आणि यंत्रसामुग्री असे १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

Chikhali Ginning Pressing Factory Fire
Mla Ganpat Gaikwad: गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदे पिता-पुत्रांवर केले गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com