Shivsena Dasara Melava live : शिवतीर्थावर कोणाकोणाची होणार भाषणे? पाहा यादी

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Live Speech : उद्धव ठाकरेंचा दादर येथील शिवाजी पार्कवर तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गोरेगाव नेक्सो सेंटर येथे दसरा मेळावा रंगणार आहे. दोन्ही मेळाव्यातून कोणावर टीका होणार? राजकीय घडामोडी आणि महत्त्वाच्या भाषणांचे अपडेट्स मिळवण्यासाठी फॉलो करा हा लाईव्ह ब्लॉग.
Shivsena Dasara Melava 2026 Uddhav Thackeray vs Eknath Shinde Live Speech
Shivsena Dasara Melava 2026 Uddhav Thackeray vs Eknath Shinde Live Speech

Shivsena Dasara Melava 2026 LIVE: "आम्ही विचारांचं सोनं लुटायला आलोय!" शिवाजी पार्कमधून ठाकरे गटाचा हुंकार; माजी आमदार रमेश कोरगावकर यांचा घणाघात

विजयादशमीच्या निमित्ताने आज दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर शिवसेना (उबाठा) पक्षाचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडत आहे.

यावेळी बोलताना रमेश कोरगावकर म्हणाले की, "आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची लोक आहोत आणि आज विजयादशमीच्या दिवशी आम्ही येथे विचारांचे सोनं लुटण्यासाठी आलो आहोत."

सध्या राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे होत असल्यावरून त्यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, "आता मेळावे खूप होतात, पण खरा मेळावा कोणता हे जनता ओळखते. आज अनेकजण तसे मेळावे घेत आहेत, मात्र आमची निष्ठा बाळासाहेबांच्या विचारांशीच आहे."

Goregaon Nesco Melava:  "फक्त एकनाथ शिंदेंनी हुकूम करावा, आम्ही..." शिंदेंच्या मेळाव्यात पंजाबी शिवसैनिकांच्या एन्ट्रीने उडाली खळबळ!

गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या मेळाव्यात विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे पंजाबी शिवसैनिकांची उपस्थिती. यावेळी त्यांनी पक्षांतर्गत घडामोडींवर उघडपणे भाष्य केले.

"संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटली"

मेळाव्यात बोलताना पंजाबी शिवसैनिकांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला. "संजय राऊत यांच्यामुळेच मुख्य शिवसेना फुटली," असा दावा त्यांनी यावेळी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मेळाव्यात एकच चर्चा रंगली.

"मदतीसाठी पंजाबी सगळ्यात पुढे"

पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांनी फक्त आम्हाला हुकूम करावा, आम्ही कुठल्याही बांधावर (कामासाठी किंवा मदतीसाठी) जायला तयार आहोत. कोणालाही मदत करण्यासाठी आम्ही पंजाबी लोक नेहमी सगळ्यात पुढे असतो." एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या मेळाव्यात पंजाबमधून आलेल्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले गेले.

Shivsena Dasara Melava 2026 LIVE Updates: शिवाजी पार्कवर ठाकरेंचा मेळावा अन् कार्यकर्त्यांनी घातलं 'राज ठाकरेंसाठी' साकडं! पोस्टर्समुळे राजकीय वर्तुळात खळबळ

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे. आजच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे, कारण शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर (शिवतीर्थ) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र, मेळावा उद्धव ठाकरेंचा असला तरी, कार्यकर्त्यांनी थेट राज ठाकरेंसाठी साकडं घातल्याचे पाहायला मिळाले आहे.

राज ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी अन् पोस्टर्स

मेळाव्यापूर्वी शिवतीर्थावर कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी तीव्र इच्छा व्यक्त करणारे पोस्टर्स आणि फलक परिसरात झळकले, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. तसेच, याच परिसरात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे पोस्टर्सही झळकल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.

दुसरीकडे नेस्को सेंटरमध्ये शिंदेंचे शक्तीप्रदर्शन

एक दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये पार पडत आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला एकनाथ शिंदे या मेळाव्यात नेमके काय उत्तर देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या या दसऱ्याच्या राजकीय महासंग्रामात दोन्ही बाजूं कडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे.

Shivaji Park Dasara Melava Live : शिवतीर्थावर दिग्गजांची भाषणे; संजय राऊतांसह उद्धव ठाकरे साधणार विरोधकांवर निशाणा

यंदाच्या दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्कवरील (शिवतीर्थ) शिवसेना (उबाठा) दसरा मेळाव्यात पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भाषणे होणार आहेत. या मेळाव्यात सुरुवातीला नितीन बानगुडे पाटील, अंबादास दानवे, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, आणि संजय राऊत यांची भाषणे पार पडणार असून, या मेळाव्याची सांगता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्य भाषणाने होणार आहे. या सर्व प्रमुख नेत्यांच्या भाषणांमधून महायुती सरकारवर कडक शब्दांत राजकीय हल्लाबोल केला जाण्याची दाट शक्यता आहे.

Shivsena Dasara Melava 2026 LIVE Updates: "मागण्या मान्य होऊनही जरांगे-पाटील का भडकलेत?" मनीषा कायद्यांच्या विधानाने राजकारणात उडाली खळबळ!

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. मनीषा कायदे यांनी दादर येथील (शिवाजी पार्क) दसरा मेळाव्यावर टीका करताना म्हटले की, दादरचा दसरा मेळावा म्हणजे केवळ अहंकार आणि नरेटिव्ह (Narrative) पसरवण्याचा प्रयत्न आहे, तर आपले मानून घेतलेला हा मेळावा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करण्यासाठी आहे.

यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यावरही भाष्य केले. शासनाकडून मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, असे सांगत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले की, मागण्या मान्य झाल्यानंतरही जरांगे-पाटील सध्या बितरल्यासारखे (नाराज किंवा आक्रमक होऊन) बोलत आहेत. या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले आहे.

Shivsena Dasara Melava 2026 LIVE Updates: 'गरिबांची साथ, मदतीचा हात, एकनाथ...'; शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार पोस्टरबाजी

Goregaon Nesco Melava :गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आणि उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नेस्को परिसर आणि मुख्य व्यासपीठाचा परिसर आकर्षक पोस्टर्स व बॅनर्सने सजवण्यात आला आहे. "गरिबांची साथ, मदतीचा हात, एकनाथ..." अशा ठळक टॅगलाईनसह महायुती सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विविध लोककल्याणकारी कामांचा पाढा या पोस्टर्सच्या माध्यमातून वाचण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' तसेच त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याचे आणि योजनांचे बॅनर्स प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. या जोरदार पोस्टरबाजीच्या माध्यमातून शिंदे गटाकडून मेळाव्याच्या ठिकाणी मोठे शक्तीप्रदर्शन केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.

Shivsena Dasara Melava 2026 LIVE: शिवतीर्थावर ठाकरेंची तोफ धडडणार की नेस्कोत शिंदेंचा आवाज घुमणार? वाचा  अपडेट्स 

Shivsena Dasara Melava LIVE: विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आज महाराष्ट्राच्या राजकारणात 'दसरा मेळाव्याचा' महासंग्राम पाहायला मिळत आहे. दादरच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून, दुसरीकडे गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये महायुतीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हुंकार घुमणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जोरदार राजकीय हल्लाबोल केला जाण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक राजकीय रणसंग्रामातील प्रत्येक घडामोडी, महत्त्वाचे दावे आणि भाषणांचे सर्वात जलद व ताजं अपडेट्स वाचण्यासाठी जोडलेले राहा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com